(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
मी आता खासदार झालो आहे त्यामुळे मागचे काळे कोळसे उगळत बसायचं का? असा सवाल निलेश लंके म्हणाले.
अहमदनगर : आपण लोकसभा (Lok Sabha Election) लढवू, मात्र पत्नीला विधानसभेचं तिकीट द्या अशी मागणी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) करत होते, असं काल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यावर आज लंकेंनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. शिळ्या कढीला ऊत देण्यात काही अर्थ नाही असं लंके म्हणाले.
खासदार निलेश लंके म्हणाले, मी वारीत असल्यामुळे दादा काय म्हटले ही बातमी ऐकली नाही. मात्र आता झालं गेलं सर्व गंगेला मिळालं. मी आता खासदार झालो आहे त्यामुळे मागचे काळे कोळसे उगळत बसायचं का? लोकसभेची निवडणूक झाली. मी, मोहिते पाटील खासदार झालो,त्यामुळे शिळ्या कढीला ऊत देण्यात काही अर्थ नाही.
लंके लोकसभेत 'हे' प्रश्न मांडणार
येत्या 22 तारखेला संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे...या अधिवेशनात नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके कांदा भावासंदर्भात आणि दुधाच्या प्रश्न मांडणार आहेत...सोबतच लोकसभा निवडणुकीवेळी आचारसंहिता असतानाही काही उच्च पदस्थ अधिकारी काही विशिष्ट राजकीय पुढाऱ्यांसोबत मिटिंग करत होते. या संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हंटले आहे. आचारसंहिता काळात संबंधित अधिकारी आणि पुढार्यांच्या बैठकीचे व्हिडिओ आपल्याकडे असलल्याचे लंके यांनी म्हंटले आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे.
छगन भुजबळ हे शरद पवारांना भेटायला आले : निलेश लंके
मंत्री छगन भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीवर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचं असं नेतृत्व आहे की, त्यांच्याकडे वेगवेगळ्या पक्षाचे लोक मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. तसेच दिल्लीला असताना देखील सर्व पक्षाचे लोक एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पवार साहेबांकडे यायचे. तशाच पद्धतीने छगन भुजबळ हे शरद पवारांना भेटायला आले असावेत असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं आहे.
कबड्डी असोसिएशनच्या निवडणूक मतदार यादीतून नाव वगळले, निलेश लंके म्हणाले...
खासदार निलेश लंके यांचं राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणूक मतदार यादीतून नाव अवैध ठरवल्यानंतर लंके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे... यासंदर्भात येत्या 18 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला आहे. सोबतच निवडणूक मतदार यादीतून आमचं नाव अन्यायकारक पद्धतीने काढलं असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे खासदार निलेश लंके यांच्या याचिकेमुळेच राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा :