एक्स्प्लोर

Anil Parab : ईडीचे चौकशीसाठी आवताण; अनिल परब मात्र साईंच्या दरबारी

Anil Parab : ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे तर दुसरीकडे परिवहन मंत्री मात्र शिर्डीत साईबाबाबांच्या दरबारी आले आहेत. परब यांचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याचे म्हटले जात आहे.

Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, अनिल परब यांनी शिर्डीत साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. अनिल परब हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहणार आहेत. अनिल परब यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता. आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आज ते ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. 

अनिल  परब यांना आज सकाळी 10 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. दरम्यान, अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का, याकडेही  राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, अनिल परब हे पूर्वनियोजित कार्यक्रमांनुसार आज मुंबई बाहेर होते. त्यामुळे ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याची माहिती त्यांच्या वकीलामार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपाय यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा  आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत.  काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.  

शिवसेना लक्ष्य?

मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग भाजपने बांधला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अनिल परब हे मुंबई महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेचे महत्त्वाचे रणनीतिकार समजले जातात. मुंबईतील वॉर्डमधील समीकरण अनिल परबांना चांगल्याच प्रकारे ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात धाडल्यास शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget