एक्स्प्लोर

Vinod Kambli : विनोद कांबळींना प्रति महिना एक लाख पगाराची नोकरी, अहमदनगरच्या उद्योजकाची स्वीकारली

Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनं आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Vinod Kambli Job : आर्थिक अडचणीत सापडलेल्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांना अहमदनगरचे उद्योजक संदीप थोरात यांनी दरमहा एक लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली होती. ही ऑफर विनोद कांबळी यांनी नुकतीच स्वीकारली आहे. याबाबत सह्याद्री मल्टिस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. सह्याद्री मल्टिस्टेट फायनान्स  कंपनीच्या मानद संचालकपदाची धूरा कांबळींवर सोपविण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी आपल्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीबाबत केलेलं  वक्तव्य अहमदनगरचे उद्योजक संदीप थोरात यांच्या पाहण्यात आले.देशासाठी खेळलेल्या खेळाडूवर अशी परिस्थिती ओढवल्याने आपण त्यांना ही ऑफर दिल्याचे संदीप थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले होते.सोबतच क्रिकेट हा मॅनेजमेंटचा खेळ आहे आणि एखाद्या फायनान्स कंपनीत ही मॅनेजमेंट खूप महत्वाचे असते त्यामुळे कांबळी यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा आमच्या कंपनीला फायदाच होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी मुंबईत जाऊन कांबळी यांची भेट घेतली आणि आपली ऑफर त्यांना सांगितली.विनोद कांबळी यांनीही ही ऑफर स्वीकारत संदीप थोरात यांचे आभार मानले.दरम्यान थोरात यांनी तात्काळ कांबळी यांना एक लाख रुपयांचा चेक प्रदान केला.

एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारे विनोद कांबळी आता सह्याद्री मल्टिस्टेट फायनान्स कंपनीच्या मानद संचालक पदी दिसणार आहेत.त्यांच्यासाठी ही नवीन कारकीर्द असणार आहे.मुंबई येथील शाखेची जबाबदारी ते यापुढे सांभाळतील अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.सोबतच ज्यांचे क्रिकेट पाहून आम्ही प्रभावित झालो त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विनोद कांबळीनं आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या 1 हजार 84 धावा आणि कसोटीत 2477 धावा आहेत. लहानपणी तो सचिनसोबत क्रिकेट खेळायचा. त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवातही दमदार पद्धतीनं केली. पण नंतर तो आपला फॉर्म कायम राखू शकला नाही आणि संघाबाहेर बाहेर पडावं लागलं.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar : भोंदू राजेंद्र गडगे याचा 'दत्तधाम दरबार' सील, पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
भोंदू राजेंद्र गडगे याचा 'दत्तधाम दरबार' सील, पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
Ahilyanagar Crime News: 'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?
'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?
Ahilyanagar Crime News: संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
Prajakt Tanpure: तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय, प्राजक्त तनपुरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय, प्राजक्त तनपुरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Embed widget