एक्स्प्लोर

दूध दरासाठी शेतकरी पुत्रांचे 6 दिवसांपासून आमरण उपोषण, दुधाला 40 रुपये हमीभाव देण्याची मागणी

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्यातील गणोरे गावात शुभम आंबरे आणि संदिप दराडे या तरुणांनी दूध दरासाठी आमरण उपोषण (Fasting to death) सुरु केलं आहे.

Agitation for Milk Price in Akole Ahmednagar : सध्या राज्यात दूध दराच्या (Milk Price) मुद्यावरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं वातावरण दिसत आहे. दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करत आहे. दरम्यान, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्यातील गणोरे गावात शुभम आंबरे आणि संदिप दराडे या तरुणांनी दूध दरासाठी आमरण उपोषण (Fasting to death) सुरु केलं आहे. आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे. दुधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळावा अशी यांची मागणी आहे. या तरुणांच्या समर्थनासाठी परिसरातील गावे एकवटली आहेत. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, दहा गावांनी पाळला कडकडीत बंद

दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज गणोरेसह परिसरातील दहा गावांनी कडकडीत बंद पाळला आहे. गणोरे, हिवरगाव, डोंगरगाव, विरगाव, पिंपळगाव, समशेरपूर, देवठाण, वडगाव लांडगा, कळस, गुंजाळवाडी, सावरगाव पाट या गावांनी कडकडीत बंद पाळला आहे. 

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलेश लंकेच्या नेतृत्वात आंदोलन सुरु

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन सुरु आहे. खासदार निलेश लंकेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. शेतकरी जन आक्रोश आंदोलनाच्या ठिकाणी दुधाच्या कॅनची हंडी उभारण्यात आली आहे. तसेच त्याला कांद्याच्या माळा देखील लावण्यात आल्या आहेत. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांचा कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढ्या, म्हशी आणि गायी घेऊन निलेश लंके आंदोलन करत आहेत.

दुधाला योग्य भाव न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

राज्यातील कांदा व दूध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे. दूधाचे भाव गेले वर्षभर सातत्याने कोसळत आहेत. दुधाला किमान 40 रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. सध्या दूधाला मिळणाऱ्या भावामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली. परंतू, अनुदानासाठीच्या जाचक अटी व शर्तीमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. नुकतीच केंद्र सरकारने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला असून विशेष म्हणजे ही आयात करमुक्त असल्यामुळे दूध उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nilesh Lanke : गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर गांधी टोपी, खासदार निलेश लंकेंचं बैलगाडीतून कांदा, दूध दरासाठी आंदोलन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र शेळके अपघात प्रकरण! नेमका कसा झाला अपघात? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
जितेंद्र शेळके अपघात प्रकरण! नेमका कसा झाला अपघात? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Pratibha Chakankar On Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून 8 तास चौकशी, काय काय विचारलं?; प्रतिभा चाकणकर सगळं बोलून गेल्या!
अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून 8 तास चौकशी, काय काय विचारलं?; प्रतिभा चाकणकर सगळं बोलून गेल्या!

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Embed widget