Ajit Pawar : गुलाबी साडीवाल्या ताईचा गुलाबी प्रश्न; अजित पवारांचं भन्नाट उत्तर, महिलांमध्ये हास्यकल्लोळ
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार दररोज गुलाबी जॅकेट परिधान करत आहेत. अजित पवार गुलाबी जॅकेट का परिधान करतात? असा प्रश्न एका महिलेने विचारला असता त्यांनी भन्नाट उत्तर दिले आहे.
Ajit Pawar अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अनेक मुद्द्यांवरून चर्चेत आले आहेत. विधान परिषद निवडणुकीत झालेल्या विजयानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदा गुलाबी जॅकेट (Pink Jacket) घातलं होतं. त्यानंतर अजित पवार दररोज गुलाबी जॅकेट वापरत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार नेमकं गुलाबी जॅकेट का परिधान करतात? याबाबत आता त्यांनी भन्नाट उत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर आहेत. माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा आणि महिलांशी संवाद साधण्यासाठी पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर आणि कर्जतमध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजही अजित पवारांनी गुलाबी जॅकेट परिधान केल्याने त्यांच्या जॅकेटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
अजित पवारांचं भन्नाट उत्तर!
अजित पवारांना आपण गुलाबी जॅकेट का घालतात? असा प्रश्न एका महिलेने विचारला असता त्यांनी भन्नाट उत्तर दिले आहे. तुम्ही एखादी आवडती साडी घालतात, तसंच मला हे गुलाबी जॅकेट घालायला आवडते, असे अजित पवारांनी म्हटले. अजित पवारांनी उत्तर देताच कार्यक्रमातील उपस्थित महिलांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाल्याचे दिसून आले.
अजित पवारांनी सांगितले सौरपंप योजनेचे फायदे
दरम्यान, पारनेर येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेनंतर (Ladki Bahin Yojana) विरोधक सरकारने लाडक्या भावांसाठी काही केले नाही, अशी टीका करतात. पण राज्य सरकार लाडक्या भावांसाठीही निर्णय घेत आहे. त्याचे उदाहरण देताना अजित पवार यांनी सौरपंप योजनेचे फायदे उपस्थित महिलावर्गाला समजावून सांगितले. शेतकऱ्यांचे तीन हॉर्स पॉवर, पाच हॉर्सपॉवर, साडेसात हॉर्सपॉवरचं बील आम्ही माफ केले आहे. लाईट बील माफ केले आहे. 14 हजार कोटींची जबाबदारी आम्ही उचलली आहे. शेतकरी म्हणून वीज पाहिजे असेल तर सोलर पंप आम्ही तुम्हाला देणार आहोत. तिकडे तारा ओढा, तसंल काही नाही. पॅनल बसतील विहीरजवळ तीनची मोटार, पाचची मोटार, साडेसातची मोटार, महाराष्ट्रात साडेआठ लाख सोलर पंप देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या