एक्स्प्लोर

Ajit Pawar: निलेश लंकेंच्या होमग्राऊंडवर अजित पवारांचं जोरदार भाषण, शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर योजना, सगळी वीज मोफत मिळवण्याचा प्लॅनही सांगितला

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजितदादा आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आजच्या सभेत पारनेरमध्ये महिलांशी संवाद साधला. अजित पवारांनी सांगितली शेतकऱ्यांसाठीची खास योजना

अहमदनगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अहमदनगरच्या दौऱ्यात जोरदार भाषण करताना शेतकरी आणि महिला वर्गाला साद घालण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गटाचे निलेश लंके हे नगरचे खासदार आहेत. त्यांचे होमग्राऊंड असलेल्या पारनेरमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांची सभा झाली. अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे रस्त्यात लोकांच्या भेटीगाठी घेत येताना अजित पवार यांना पारनेरमध्ये पोहोचायला उशीर झाला. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार भाषण ठोकत आगामी काळात राज्य सरकारच्या योजनांमुळे शेतकरी आणि महिला वर्गाचे कशाप्रकारे भले होणार आहे, हे सविस्तरपणे सांगितले.

लाडकी बहीण योजनेनंतर विरोधक सरकारने लाडक्या भावांसाठी काही केले नाही, अशी टीका करतात. पण राज्य सरकार लाडक्या भावांसाठीही निर्णय घेत आहे. त्याचे उदारण देताना अजित पवार यांनी सौरपंप योजनेचे फायदे उपस्थित महिलावर्गाला समजावून सांगितले. त्यांनी म्हटले की, ही गोष्ट माझ्या माय माऊलींनी लक्षामध्ये घ्या आणि ते सांगायला आवर्जून पारनेरमध्ये मी आलेलो आहे. तुम्ही मोठ्या संख्येने आलात. मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण येताना थांबत थांबत यावं लागलं होतं. याचबरोबर तुम्ही जे शेतकरी असेल त्यांचं तीन हॉर्स पॉवर, पाच हॉर्सपॉवर, साडेसात हॉर्सपॉवरचं  बील आम्ही माफ केले आहे. लाईट बील माफ. त्याच्यामध्ये 14 हजार कोटीची जबाबदारी आम्ही उचलली आणि आता इथून पुढे तुमच्या शेतकरी म्हणून वीज पाहिजे असेल तर सोलर पंप आम्ही तुम्हाला देणार आहोत. तिकडे तारा ओढा, तसंल काही नाही. पॅनल बसतील विहीरजवळ तीनची मोटार, पाचची मोटार, साडेसातची मोटार, महाराष्ट्रात साडेआठ लाख सोलर पंप देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे अजितदादांनी सांगितले.

सौरपंप योजनेचा कसा फायदा होणार?

अजित पवार यांनी आपल्या भाषणात मोफत सौरपंप योजनेचे फायदे समजावून सांगितले. त्यामुळे पुढे काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? दिवस उजाडला, सूर्य उगवला, आठ वाजता सोलरचे पॅनल तापणात, तुमची मोटार  चालू. त्याला ती वीज सूर्यापासून मिळणार आहे, पैसे भरायचे नाहीत. बिल थकलंय, कनेक्शन तोडलंय, आकडा टाकलाय, भानगड नाही. पती शेतकरी तिथं पिकाला पाणी देतील फळबागांना पाणी देतील फुलझाडांना पाणी देतील आणि तुमची शेती पिकवतील. रात्र संध्याकाळ झाली सूर्य मावळला की मोटर बंद. कारण सूर्य असेल तरच ते चालतं. रात्री शेतकऱ्यांनी कारभाऱ्यांनी घरी जायचं, कारभारणीने केलेलं जेवण जेवायचं आणि मुलाबाळांच्यात राहायचं आणि झोपायचं.   आता काय होतंय काही दिवस सकाळी आणि काही दिवस रात्रीच्यावेळी शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जावं लागतंय. 

आमच्या शिरूर तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये  बिबट्या यायला लागलेत रात्री आणि त्याच्यामुळे शेतकरी पण घाबरायला लागला. घरातील महिलांना पण वाटतं याला नवरा गेलाय पाणी धरायला किंवा पिकाला पाणी पाजायला पण  बिबट्याने हल्ला केला तर काय? ही काळजी आता राहणार नाही आणि बिबट्यांच्या करता वेगळा बंदोबस्त आम्ही केलेला तो सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. अशा पद्धतीने विंचू काट्याचं रात्री-अपरात्री आपल्या कारभाऱ्याला तिकडे पाणी द्यायला जायची गरज नाही. अशाप्रकारची आपण ही योजना आणलेली आहे. साडेआठ लाख पंप आणि नऊ हजार मेगावॅट वीज आम्ही सोलरवर देत आहोत. दीड वर्षात ही योजना सुरु होईल. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला लागेल. ही योजना लाडक्या भावांसाठी नाही का, ही चांगली योजना नाही का, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडी सेविकांना वेगळे 50 रुपये मिळणार

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar news: अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget