Ahmednagar News : मराठा आरक्षण लढ्यात तमाशा कलावंत, 15 दिवस तमाशा न करण्याचा घेतला निर्णय, अहमदनगर जिल्ह्यांत आंदोलने!
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही मराठा समाज एकवटला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. कुठे आंदोलने तर कुठे रास्ता रोको तर कुठे कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे.
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर राज्यभरात आंदोलने सुरु असून अनेक ठिकाणी आंदोलने (Portest), उपोषण, रास्ता रोको, बंद पाळण्यात येत आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही मराठा समाज एकवटला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. कुठे आंदोलने तर कुठे रास्ता रोको तर कुठे कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे. तसेच जिल्ह्यातील तमाशा कलावंतांनी (Tamasha) देखील मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दिला असून पुढील 15 दिवस तमाशा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षण मागणीसाठी (Maratha Arakshan) अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बंद पाळण्यात येतो आहे. ठिकठिकाणी साखळी आणि आमरण उपोषण करून मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला जातो आहे. संगमनेर (sangamner) तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या निमगाव जाळी येथे गावबंद ठेवत ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. ग्रामदैवत बिरोबा महाराज मंदिरात मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी अकोले तालुक्यातील कळस गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. कोल्हार घोटी मार्गावरील कळस गावात हे आंदोलन करण्यात आलं असून गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
तसेच मराठा आंदोलनाच्या लढ्यात आता इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यानंतर जिल्ह्यातील तमाशा कलावंतांनी सहभाग घेतला आहे. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी दिला मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून 15 दिवस तमाशा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण दसऱ्यानंतर तमाशा फडाचा राज्यात दौरा सुरू होतो. मात्र मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत 15 दिवस कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागणी रघुवीर खेडकर यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व व्यवहार बंद ठेवत अकोलेकरांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण लढ्याला राज्यभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
मराठा आरक्षणास दलित-मुस्लिम बांधवांचा पाठिंबा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेट घेत असतांना मराठा बांधवांना पाठिंबा देत जिल्ह्यातील पढेगाव येथील दलित व मुस्लिम बांधवांनी राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करत श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या लक्षणीक उपोषणास पाठिंबा देत गावातील दलित व मुस्लिम बांधवांनी जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन सरकारने मराठा बांधवांना आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे. तर मागील पाच दिवसांपासून शिर्डीत साखळी उपोषण सुरू असून शिर्डीतील सात तरुणांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलं असून आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरते आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार असल्याचं उपोषणकर्त्यानी म्हणल आहे.
इतर महत्वाची बातमी :