एक्स्प्लोर

Ahmdnagar Ganesh : अहमदनगरच्या गणपती बाप्पाची थेट परदेशवारी; आठ लाख रुपये किंमत, थायलंडच्या गणेश मंदिरात स्थापना 

Ahmednagar News : श्रीगोंदा येथील गणेश मूर्तींची 'क्रेझ' थेट थायलंडमध्येही (Thailand) वाढली असून यंदाच्या गणेशोत्सवासाठी मोठी मागणी केली जात आहे. 

अहमदनगर : लाडक्या बाप्पाचे आगमन (Ganesh Chaturthi 2023) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश मूर्ती कारखान्यात मूर्तीकार बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील गणेश मूर्ती कारखान्यातही लगबग वाढली आहे. श्रीगोंदा येथील गणेश मूर्तींची 'क्रेझ' थेट थायलंडमध्येही (Thailand) वाढली असून यंदाच्या गणेशोत्सवासाठी मोठी मागणी केली जात आहे. 

महाराष्ट्रातील सर्वच गणपती (Ganeshotsav 2023) कारखान्यामध्ये गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. गणेशभक्तांना गणपती आगमनाचे वेध लागले असून जसा गणेशोत्सव महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसाच काहीसा परदेशातही गणपती आगमनाचा उत्साह असतो. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश गणेश मूर्ती विक्रीसाठीसाठी देखील बाजार आलेल्या आहेत. येथील गणेश मूर्तीचे विशेष राज्यासह परदेशातून या मूर्तीना मागणी असते.  श्रीगोंद्यातील (Shreegonda) कलाकार अनुजित दिवटे (Ajujeet Divte) यांच्या संकल्पनेतून 'दगडूशेठ हलवाई' (Dagdusheth Halwai) आणि 'लालबागचा राजा' यांची युनिक प्रतिकृती असलेल्या 500 पेक्षा जास्त गणेशमूर्ती थायलंडला रवाना झाल्या आहेत. 

यंदाचा गणशोत्सव (Ganesh Chaturthi) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यावर्षी श्रीगोंदा येथील कुंभारवाड्यात 10 ते 12 हजार लक्षवेधी गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, फायबरपासून गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. यातून 70 ते 80 लाखांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. अनुजित दिवटे यांच्या एकट्याच्या कारखान्यात जवळपास 20 लाखांपर्यंत उलाढाल होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. श्रीगोंद्यात दिवटे यांचा गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय तीन पिढ्यांपासून सुरु आहे. त्यांचे वडील केशव दिवटे हे वकील व्यवसाय सांभाळून हा व्यवसाय करायचे. पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्ती बनवायचे, मात्र त्यांच्या मुलांने मुंबई (Mumbai) येथे जे. जे. आर्टस् स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि पारंपरिक मूर्ती बनवण्यापेक्षा युनिक मूर्ती बनवण्याचे धोरण घेतले.

यंदा थायलंडला मूर्ती रवाना 

दरम्यान राज्यासह देशभरात गणेशोत्सव साजरा केला जातोच, शिवाय परदेशात देखील गणपती उत्सव साजरा केला जातो. याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ डोळ्यांसमोर ठेवून दिवटे यांनी गणेशमूर्ती तयार केल्या आहेच. यंदा थायलंड येथील गणेश मंदिरात अनुजित यांच्या हाताने साकारलेली गणेशमूर्ती बसवण्यात येणार आहे. या मूर्तीची किंमत आठ लाख रुपये इतकी असल्याचे ते म्हणाले आहेत. अनुजित यांनी बनवलेल्या 'दगडूशेठ हलवाई' आणि 'लालबागचा राजा' यांची प्रतिकृती असलेल्या 18 आणि 24 इंचाची मूर्ती थायलंडसाठी बनवल्या आहेत. मूर्तीची किंमत दोन ते अडीच हजार आहे. मात्र अलंकार वस्त्रासह एका गणेशमूर्तीची किंमत 12 ते 15 हजारांच्या घरात जाते. 

श्रीगोंद्याचा नावलौकिक सातासमुद्रापार

विशेष म्हणजे दिवटे यांच्या मूर्ती कारखान्यात मुस्लीम कलाकार देखील काम करतात, सात्विकता जपत हे कलाकार मूर्तीकाम करतात. मुस्लिम कलाकार या कालावधीत मांसाहार करत नाहीत. मोठ्या भक्तिभावाने आणि आवडीने ते हे काम करतात. श्रीगोंदा येथील कुंभारवाड्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरु आहे. अगदी सहा इंचापासून ते सात फुटांपर्यंत इथे मूर्ती बनवल्या जातात. शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, फायबरपासून गणेशमूर्ती इथे उपलब्ध आहेत. आता परदेशातूनही या मूर्तीला मागणी वाढत असल्याने श्रीगोंद्याचा नावलौकिक सातासमुद्रापार गेला आहे.

इतर महत्वाची बातमी : 

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' गाण्याची धून तयार करणाऱ्या वडापाव विक्रेत्याची गाथा, पाच वर्षांपासून होता प्रसिद्धीपासून दूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget