एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2023 : श्री गणेशाचा जन्म कसा झाला? हत्तीचं शीर कुणी शोधलं? यामागची रंजक माहिती जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023 Date : भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाल्याचं मानलं जातं. त्यामुळे याला गणेश चतुर्थी असं म्हणतात. गणपतीच्या जन्माची रंजक कथा (Ganesh Janm Katha) जाणून घ्या.

मुंबई : आतुरता आगमनाची... सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) 19 सप्टेंबरला मंगळवारी आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदू धर्मानुसार, या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या दिवसाला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असंही म्हटलं जातं. या दिवशी लाडक्या गणरायाची मूर्ती जयघोषात घरी आणतात आणि त्याची स्थापना करुन मनोभावे पूजा केली जाते. गणेशभक्त फक्त भारतातच नाहीतर तर जगभरात आहे. भारतासह जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि त्याची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या विसर्जनाने होते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाल्याचं शास्त्रात सांगितलं जातं. गणपतीच्या जन्म कसा झाला तुम्हाला माहित आहे का? श्री गणेशाच्या जन्मामागे एक अतिशय रंजक कथा आहे. ही कहाणी वाचा सविस्तर...

गणेशाच्या जन्माची रंजक कथा

श्री गणेश माता पार्वतीचा पुत्र आहे. गणपतीच्या जन्मामागे अतिशय रंजक कथा आहे. शिवपुराणातील कथेनुसार, एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीरावर हळदी आणि उटणे लावलं होते. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकला, अशाप्रकारे श्रीगणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने अंघोळीला जाताना दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्रीगणेशाला बसण्याची आज्ञा केली. यावेळी भगवान शंकर आले. पण  गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शीर धडापासून वेगळं केलं.

यानंतर जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दु:ख झालं. यावेळी माता पार्वतीने महादेवाला यामागचं कारण विचारलं. यानंतर माता पार्वतीने गणपतीचं शीर कापण्यामागचं कारण विचारलं आणि आपल्या मुलाचे शीर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला. यावेळी सर्व देवता तेथे जमा झाले. यानंतर भगवान शंकर आणि भगवान विष्णूच्या आदेशानंतर गरुड देवाने उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शीर आणण्यासाठी निघाले. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर त्यांना एक हत्ती सापडला आणि त्यांनी हत्तीचं शीर कापून आणलं. यानंतर शंकराने ते शीर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. 

पण, यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती. कारण, गणपतीचं शरीर मानवी आणि शीर हत्तीचं होतं. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्रीगणेशाची पूजा केली आजे. तसेच हत्तीच्या शीरामुळेच श्रगणेशाला गजमुख हे नाव पडलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ganesh Chaturthi 2023 : यंदा गणेश चतुर्थीला अद्भुत योग, 'या' राशीच्या लोकांना होणार धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget