एक्स्प्लोर
Advertisement
फक्त कलाकारांनीच भूमिका का घ्यायची, सामान्य माणसांनीही भूमिका घ्यावी : अतुल कुलकर्णी
मराठी सिनेमासह हिंदी आणि साऊथच्या सिनेमात देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळं वलय निर्माण करणारे अभिनेते म्हणून अतुल कुलकर्णी यांची ओळख आहे. अतुल कुलकर्णी यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
मुंबई : माझा व्यवसाय हा माझ्या आयुष्याचा छोटा भाग आहे. माझा व्यवसाय माझं आयुष्य नाही. मग मी जे पाहतो, वाचतो त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. म्हणून फक्त लेखक, कलाकारांनीच नाही तर भूमिका प्रत्येकानेच घ्यावी, असे अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. आयुष्य जगताना तुमच्या आजूबाजूची लोक महत्वाची आहे. त्यांची भूमिका देखील महत्वाची आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात अतुल कुलकर्णी यांनी अनेक विषयांवर संवाद साधला.
यावेळी अतुल कुलकर्णी म्हणाले की, समाज म्हणून आपण वैचारिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या कुठे पोहोचलोय हे पाहणं गरजेचं आहे. तुमच्या समजुती काय आहेत यावरून लोकं गोष्टी निवडतात. अर्थात निवडीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवं. वर वर जे दिसत ते रिफ्लेक्शन असतं. कट्टरपणा कुठल्याही गोष्टीत वाईट असतो, असंही ते म्हणाले.
ते म्हणाले की, कला केवळ विचारांना फुंकर घालते. कलेमध्ये क्रांती करण्याची ताकत नाही. कुठल्याही प्रकरणावर मत व्यक्त करणं किंवा मत ऐकून घेणं हे कुठल्याही सदृढ समाजाच्या लक्षण आहे. आपल्याला विचार निवडीचं स्वातंत्र्य आहे, असं त्यांनी जेएनयू प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.
मुलं जन्माला न घालण्याच्या निर्णयाविषयी ते म्हणाले की, कुठलाही एक वाक्य हे विचारातून आले. आपल्याकडे जास्तीत जास्त दहा हजार लोक एका वेळेला एकत्र राहू शकतात. त्या पलीकडे गेलं तर संघर्ष सुरु होतो. आता ज्या परिस्थितीला आपण पोहोचलोय तिथे आपल्याला नवीन नियम करावे लागतील. जुने नियम आपल्याला मोडावे लागतील. लग्न झालं कि मूल जन्माला घालणं बंद करावं लागेल. लग्न झालं म्हणजे मुलं जन्माला घालणे बंधनकारक नाही. आपण नव्या जन्माला सगळं व्यवस्थित देऊ शकतो का? याचा विचार करायला हवा. ते म्हणाले आज शाळा प्रदूषणामुळे बंद करावे लागत आहेत. मुलं जन्माला घातलं की त्याला घर, अन्न लागणार. 2020 मध्ये प्रचंड उलथापालथ होऊ शकते. मनुष्यप्राण्यांनी आणखी मनुष्यप्राणी जन्माला घालणे बंद करणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही मुलं जनमेला घातलं नाही, असे अतुल कुलकर्णी म्हणाले. हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला होता, असे ते म्हणाले.
आपल्या डाएटविषयी बोलताना ते म्हणाले की, मी मला आवडतं ते सगळं खातो. पण खाण्याच्या वेळा मात्र पाळतो. मला व्यायाम आजिबात आवडत नाही. मात्र आपण आपल्या रोजच्या दैनंदिनीत व्यायान कव्हर करु शकतो, असं त्यांनी सांगितलं. तसंच माझ्या घरात फ्रीज, सोफा, वॉशिंग मशीन अशा अनेक गोष्टी नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत
Advertisement