एक्स्प्लोर

Nagpur Court News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास 20 वर्षे कारावास

नराधमाने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा कट रचला. झोपडीत नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या नराधमास 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

नागपूरः अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती एस.आर.त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला.  ही घटना मानकापूर परिसरातील आहे.

गुरुदयाल उर्फ राजू रामेश्वर खतरिया (वय 30) असे आरोपीचे नाव आहे. घटनेपूर्वी तो झिंगाबाई टाकळीतील गीतानगरात भाड्याने राहत होता. घटनेच्यावेळी पीडित मुलगी 16 वर्षांची होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसविले होते. दरम्यान, त्याने मुलीला पळवून नेण्याचा कट रचला. त्यानुसार, त्याने एप्रिल 2020मध्ये मुलीला भेटण्यासाठी बोलावले. त्याच्या सांगण्यावरुन मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असल्याची माहिती देऊन दुपारी 4च्या सुमारास घरून निघून गेली. त्यानंतर ती घरी पत आली नाही. आरोपीने तिला दुचाकीवर बसवून गोधनी परिसरातील झोपडीत नेले. तेथे त्याने मुलीवर वारंवार बलात्कार केला होता.

नऊ साक्षीदारांची तपासणी

न्यायालयात सरकारच्यावतीने अॅड. कल्पना पांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आरोपीविरुद्ध 9 साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब व वैद्यकीय पुराव्यांवरुन आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला.

बालकाच्या खुनातील आरोपीला जामीन

नागपूरः सत्र न्यायालयाने नंदनवन येथील बालकाच्या खून प्रकरणातील आरोपी सौरभ वैरागडे (वय 21) याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. 
वंशिल डोईफोडे (वय 11) असे मृत बालकाचे नाव होते. 14 डिसेंबर 2021 रोजी वंशिल व त्याची लहान बहीण चिप्स खरेदी करण्यासाठी दुकानात गेले होते. दरम्यान आरोपी वैरागडे व श्रेयस मेश्राम (20) यांनी वंशिल डॉलीला निर्जन गल्लीत नेले आणि वंशिलला बुक्कांनी जबर मारहाण केली. त्यानंतर वंशिलची तब्येत खराब झाली व तो 19 डिसेंबर रोजी मरण पावला, अशी तक्रार आहे.

पाच आरोपींना अटपूर्व जामीन

नागपूरः जमीन विक्री व्यवहाराच्या वादातून फसवणूक व इतर संबंधित गुन्हे दाखल झालेल्या पाच आरोपींना सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. कमलेश दाढे, नारायण डेंबले, गौरीशंकर सचानी, अतुल डेंबले व विजय रमाणी अशी आरोपींची नावे असून, ते जमिनीचे मालक होते. पिरॅमिड रियल्टर्सचे नावेद साजित अली व इतरांनी या आरोपींची चिंचभवन येथील 26.20 एकर जमीन 18 कोटी 22 लाख रुपयांत खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्यानंतर आरोपींनी संपूर्ण रक्कम घेऊन केवळ 16.87 एकर जमिनीचे विक्रीपत्र करून दिले. अशी तक्रार आहे. आरोपींतर्फे वरिष्ठ अॅड. अविनाश गुप्ता, अॅड. एम.बी. नायडू व अॅड. शेख सोहोलुद्दीन यांनी बाजू मांडली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Embed widget