एक्स्प्लोर
पुण्यात तीन अल्पवयीन मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न, दोघींचे मृतदेह हाती
पुणे: पुण्यातील खडक परिसरातील तीन अल्पवयीन मुलींनी कॅनॉलमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. त्यातील दोन मुलींचे मृत्यदेह हाती लागली असून तिसऱ्या मुलीचा शोध सुरु आहे.
श्रुती वाघमारे, अबेदा शेख आणि मुस्कान मुलतानी असं या मुलींची नावं आहे. या तिघींपैकी मुस्कानचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
या तिन्ही मुली कासेवाडी भागातील राहणाऱ्या होत्या. मुस्कान 8वीत होती तर आबेदा 9 नववी आणि श्रृती 11वीत होती. तीन ते चार दिवसांपासून या मुली शाळेत जात नव्हत्या. त्यामुळे काल मुस्कान मुलतानीची आई तिला रागावली. त्यानंतर ती आबेदाच्या घरी गेली. तिथून दोघी बाहेर पडताना आम्ही आता घरी येणार नाही अस म्हणाल्या होत्या.
घरातून निघाल्यानंतर या दोघीही श्रृतीकडे पोहचल्या. त्यानंतर त्या तिघीही गोळीबार मैदानाजवळच्या कॅनॉलजवळ आढळून आल्या. पण संध्याकाळी 6:40 नंतर मात्र त्या दिसल्या नाहीत. त्यानंतर शोध सुरु झाला. संध्याकाळी उशीरा दोघींचे मृतदेह सापडले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement