मराठा क्रांती मूक मोर्चाच लोण ठाण्यापर्यंत येऊन पोचलं आहे. आज ठाण्यात मराठा समाजाच्या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता हा मोर्चा सुरु झाला.
2/5
ठाण्यातील मराठा मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक मराठा मोर्चामुळे रद्द करण्यात आला आहे. तसंच मध्य रेल्वेकडून 40 जादा लोकलही धावणार आहेत.
3/5
तीन हात नाक्यावर मराठा क्रांती मूक मोर्चाची गर्दी पाहायला मिळाली.
4/5
मोर्चा सुरु करण्यापूर्वी प्रार्थनाही करण्यात आली.
5/5
मराठा समाजातील तरुण या मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.