LIVE | शिवसेना-भाजप लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी युती, मुख्यमंत्र्यांची घोषणा
LIVE
Background
मुंबई : शिवसेना-भाजप युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आज सायंकाळी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अधिकृत घोषणा करतील. त्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह दुपारी साडेचारच्या सुमारास मुंबईत दाखल झाले आहेत. दोन्ही पक्षनेत्यांनी राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठका सुरु केल्या आहेत.
अमित शाह मुंबईत दाखल झाले असून, सोफीटेल हॉटेलमध्ये शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला मातोश्रीवरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. शिवसेनेच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक बडे नेते उपस्थित आहेत.
दरम्यान अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचेही मुंबईतले अनेक नेते सोफीटेल हॉटेलमध्ये भाजपच्या बैठकीला उपस्थित आहेत. ही बैठक संपल्यानंतर अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस हे दोघेच 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. त्यानंतर या नेत्यांमध्ये युतीसंदर्भात बोलणी होतील.
व्हिडीओ
सायंकाळी 6.30 वाजता शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत अमित शाह आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करतील.