एक्स्प्लोर
'उडता पंजाब'च्या पायरसीमुळे बॉलिवूड भडकलं
1/8

उडता पंजाब सिनेमाच्या लिक कॉपीमुळे हा सिनेमा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडने प्रेक्षकांना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची विनंती केली आहे.
2/8

उडता पंजाब 17 जून रोजी रिलीज होणार आहे, मात्र पायरसीच्या ग्रहणामुळे संपूर्ण स्टार कास्ट चिंतेत आहे.
3/8

सिद्धार्थ कपूरनेही सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची विनंती केली आहे.
4/8

या सिनेमात अनेक जणांनी रक्ताचं पाणी करुन काम केलं आहे. यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. हा सिनेमा सर्वांनी थिएटरमध्येच पाहावा, असं शाहिद कपूरने म्हटलं आहे.
5/8

प्रामाणिक चित्रपटासाठी प्रामाणिक प्रेक्षकांची गरज असते, असं बिपाशा बासूने लिहिलं आहे.
6/8

आलीया भट्टने तर प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली आहे. उडता पंजाब सिनेमासाठी गेल्या दोन वर्षांपासून कठीण परिश्रम घेतले आहेत. दोन वर्षांची कठीण मेहनत, रक्त आणि आमचे गेलेले अश्रू व्यर्थ जाऊ देऊ नका, सर्वांनी कृपया थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहा, अशी विनंती आलिया भट्टने केली आहे.
7/8

अभिनेता शाहिद कपूरने ट्विट करुन सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची विनंती केली आहे.
8/8

Published at : 16 Jun 2016 03:54 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















