एक्स्प्लोर
या दिग्गज बॉलीवूड स्टार्सकडून माणुसकीचे दर्शन
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/26182545/AMIR-WEB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![आज आम्ही बॉलीवूडच्या अशा काही चेहऱ्यांची माहिती सांगणार आहोत, ज्यांनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. बॉलीवूडमधील अनेक स्टार आपल्या अभिनयातील कठोर परिश्रमाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. पण त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही यांनी आपल्या कार्याने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/26182545/AMIR-WEB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज आम्ही बॉलीवूडच्या अशा काही चेहऱ्यांची माहिती सांगणार आहोत, ज्यांनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. बॉलीवूडमधील अनेक स्टार आपल्या अभिनयातील कठोर परिश्रमाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. पण त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही यांनी आपल्या कार्याने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
2/8
![बॉलीवूडची मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन ही माणूसकीचं मूर्तीमंत उदाहरण आहे. ती एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपले सामाजिक काम करते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/26182409/6131.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडची मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन ही माणूसकीचं मूर्तीमंत उदाहरण आहे. ती एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपले सामाजिक काम करते.
3/8
![बॉलीवूडचा बादशहा किंग खानची तरुणांमध्ये मोठी क्रेझ असते. पण काही ठराविक लोकांनाच माहिती असेल की, तो अभिनय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही तितक्याच प्रभावीपणे काम करतो. त्याची Make a wish ही स्वयंसेवी संस्था अतिशय दुर्धर आजारांशी झुंजणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी काम करते. शाहरूख खान त्याच्या फाऊंडेशनचे चॅरीटीसाठी शो, इंटरव्यू आणि कॉन्सर्टही करतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/26182407/5172.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडचा बादशहा किंग खानची तरुणांमध्ये मोठी क्रेझ असते. पण काही ठराविक लोकांनाच माहिती असेल की, तो अभिनय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही तितक्याच प्रभावीपणे काम करतो. त्याची Make a wish ही स्वयंसेवी संस्था अतिशय दुर्धर आजारांशी झुंजणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी काम करते. शाहरूख खान त्याच्या फाऊंडेशनचे चॅरीटीसाठी शो, इंटरव्यू आणि कॉन्सर्टही करतो.
4/8
![बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्टची ओळख असलेला आमीर खान विविध सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतो. त्याची 'सत्यमेव जयते' ही सामाजिक संस्था देशभरातील लाखो व्यसनाधिन तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे करते. तसेच महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचे काम हाती घेण्यासाठी स्थापन केलेल्या 'पाणी' फाऊंडेशननेही मोठे काम केले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/26182406/4178.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्टची ओळख असलेला आमीर खान विविध सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतो. त्याची 'सत्यमेव जयते' ही सामाजिक संस्था देशभरातील लाखो व्यसनाधिन तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे करते. तसेच महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचे काम हाती घेण्यासाठी स्थापन केलेल्या 'पाणी' फाऊंडेशननेही मोठे काम केले आहे.
5/8
![बॉलीवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारनेही महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली आहे. अक्षयने १८० कुटुंबांना प्रत्येकी ५० हजारांची मदत केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/26182404/2209.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारनेही महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली आहे. अक्षयने १८० कुटुंबांना प्रत्येकी ५० हजारांची मदत केली आहे.
6/8
![महाराष्ट्रातील मराठवाडापासून ते विदर्भापर्यंत दुष्काळामुळे अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येने व्यथित झालेल्या नाना पाटेकर यांनी पुढाकार घेऊन हजारो शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देऊन जवळपास ३०० विधवांना एक आधार देण्याचे काम केले आहे. त्यांनी मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत 'नाम' फाऊंडेशनची स्थापना करून, दुष्काळ निवारणाची अनेक काम हाती घेतली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/26182402/1289.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रातील मराठवाडापासून ते विदर्भापर्यंत दुष्काळामुळे अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येने व्यथित झालेल्या नाना पाटेकर यांनी पुढाकार घेऊन हजारो शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देऊन जवळपास ३०० विधवांना एक आधार देण्याचे काम केले आहे. त्यांनी मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत 'नाम' फाऊंडेशनची स्थापना करून, दुष्काळ निवारणाची अनेक काम हाती घेतली.
7/8
![प्रियंका चोप्रा सध्या जगभरात तिच्या अभिनयाने लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर आहे. पण तिचे सामाजिक काम काही बोटावर मोजणाऱ्या लोकांनाच माहित असेल. प्रियंकाने बालमजूरांच्या हक्कांसाठी उभारलेला लढा अतिशय व्यापक आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/26182359/953.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंका चोप्रा सध्या जगभरात तिच्या अभिनयाने लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर आहे. पण तिचे सामाजिक काम काही बोटावर मोजणाऱ्या लोकांनाच माहित असेल. प्रियंकाने बालमजूरांच्या हक्कांसाठी उभारलेला लढा अतिशय व्यापक आहे.
8/8
![जॉन अब्राहम हा 'पेटा' नावाच्या संस्थेसाठी काम करतो. ही संस्था प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करतो. इतकेच नव्हे, तर जॉन आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/26182357/797.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॉन अब्राहम हा 'पेटा' नावाच्या संस्थेसाठी काम करतो. ही संस्था प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करतो. इतकेच नव्हे, तर जॉन आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतो.
Published at : 26 Jul 2016 06:31 PM (IST)
Tags :
Bollywood Starsअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)