युलिया सलमानच्या कुटुंबाच्या अत्यंत जवळ असल्याचं बोललं जातं. मात्र आता लग्नाच्या अधिकृत घोषणेकडं चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
2/9
दरम्यान सलमानच्या लग्नाबाबत अजून कसलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
3/9
सलमानने लवकरात लवकर लग्न करावं, अशी आईची इच्छा आहे. त्यामुळेच सलमानने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.
4/9
सलमान 37 वर्षीय यूलिया वंतूर हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार, अशी माहिती आहे.
5/9
'सुलतान'च्या शुटिंग दरम्यान युलिया आणि सलमानची आई दोघी एअरपोर्टवर सोबत दिसल्या होत्या.
6/9
लग्न सोहळ्यासाठी मित्र आणि परिवार असे केवळ 15 ते 20 लोक उपस्थित असणार आहेत.
7/9
18 नोव्हेंबरला सलमानच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. या दिवशी सलमान लग्न करणार, असं त्याने स्वतः जाहीर केलं होतं.
8/9
दिल्ली टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे. दिल्ली टाईम्सच्या सुत्रांच्या माहितीनुसार सलमानने 29 ऑगस्ट रोजी एका पार्टीत 18 नोव्हेंबर रोजी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
9/9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या लग्नाचा संस्पेंस अखेर संपला आहे. सलमानने लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.