एक्स्प्लोर
Advertisement
नेहरूंविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगीची जामिनावर सुटका
पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे पिता मोतीलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी अटकेत पायल रोहतगीची मंगळवारी (17 डिसेंबर) 25 हजारांच्या दोन जामीनांवर सुटका करण्यात आली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केल्याने राजस्थानच्या बुंदी पोलिसांनी पायलला अहमदाबाद येथून अटक केली होती.
मुंबई : कायमच वादात राहणारी आणि वादग्रस्त व्हिडीओ बनवून वेगवेगळ्या प्रकारची राजकीय टिप्पणी करणारी अभिनेत्री पायल रोहतगीला चांगलेच महागात पडले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे पिता मोतीलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी अटकेत पायल रोहतगीची मंगळवारी (17 डिसेंबर) 25 हजारांच्या दोन जामीनांवर सुटका करण्यात आली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केल्याने राजस्थानच्या बुंदी पोलिसांनी पायलला अहमदाबाद येथून अटक केली होती.
पायल रोहतगीने अटकेबाबत स्वत: ट्वीट करत नाराजी व्यक्त केली होती. तर पायल रोहतगीचे पती संग्राम सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रकरणाची दखल देण्याची विनंती केली होती. संग्राम सिंहने ट्विटरवर गृहमंत्रालय, पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेंशन करुन लिहिलं होत की, काँग्रेसशासित या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? सर कृपया याकडे लक्ष द्या.
पायल रोहतगीचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत तिला 8 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पायल रोहतगीच्या अटकेनंतर तिचा पती संग्राम सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मदतीची मागणी केली होती. 'गुगलवर उपलब्ध असलेली माहितीच या वादग्रस्त व्हिडीओमध्ये आहे. पायलविरोधातील प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे', असा दावा संग्राम सिंहने केला आहे.
देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे मोतीलाल नेहरु यांचे सावत्र पुत्र होते. तसंच पंडित नेहरु यांच्या खऱ्या वडिलांचं नाव मुबारक अली होतं, असा दावा पायल रोहतगीने या व्हिडीओमध्ये केला आहे. शिवाय मोतीलाल नेहरु यांनी पाच लग्न केली होती, असंही तिने म्हटलं आहे. सोबतच व्हिडीओमध्ये पायलने काँग्रेस, जवाहरलाल नेहरु आणि मोतीलाल नेहरु यांच्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले होते. प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव आणि बुंदी येथील रहिवासी चर्मेश शर्मा यांनी पायलविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement