एक्स्प्लोर

Scoop Web Series Review: स्कूप...विचार करण्यास भाग पाडणारी गोष्ट

Scoop Web Series Review In Marathi: स्कूप ही वेब सीरिज पाहताना तुम्हाला पडद्यावर नाट्य दिसते...मात्र,हे नाट्य व्यवस्थेला थेट प्रश्न विचारतो...

Scoop Web Series Review:  शाहीर संभाजी भगत आपल्या शाहिरी जलसामध्ये  एक वाक्य म्हणतात, आम्ही तुमचं मनोरंजन करायला आलो नाही, तर तुम्हाला डिस्टर्ब करायला आलो आहोत. अर्थात हे डिस्टर्ब करणे म्हणजे त्यांच्या शाहिरी जलशाच्या गाण्यातून व्यवस्थेला, व्यवस्था चालवणाऱ्या आणि व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून आपला सवाल असतो, आपल्यासमोर काही प्रश्ने उभे केले जातात. त्यातून प्रेक्षक डिस्टर्ब होतो. हंसल मेहता यांच्या मागील काही कलाकृती आणि आता नुकतीच प्रदर्शित झालेली स्कूप ही वेब सीरिज (Scoop Web Series) आपल्या अस्वस्थ करते...काही प्रश्नही आपल्यासमोर ठेवते. 

पत्रकारितेच्या भाषेत स्कूप म्हणजे एखाद्या घटनेतील जरा वेगळी एक्सक्लुझिव्ह बातमी, मोठा गौप्यस्फोट...अशी बातमी ज्यात बड्या अधिकाऱ्यांपासून, प्रशासन यंत्रणेवर दबाव निर्माण होऊ शकतो. स्कूप ही वेब सीरिज राज्यात गाजलेल्या जे डे हत्याकांडावर आधारीत आहे. या प्रकरणातील आरोपी असलेली आणि कोर्टाने नंतर निर्दोष सुटका केलेल्या पत्रकार जिग्ना वोरा (Jigna Wora) यांनी लिहिलेल्या Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्तकावर वेब सीरिजची कथा बेतली आहे.

पोलीस, अंडरवर्ल्ड, पत्रकार यांच्याभोवती या वेब सीरिजची कथा फिरते. सहा एपिसोडची असलेली वेब सीरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरली आहे. ज्योतिर्मय डे उर्फ जे डे हे मुंबईतील नावाजलेले क्राईम रिपोर्टर होते. त्यांच्या हत्येमुळे मुंबईत खळबळ उडाली होती. हत्येपूर्वी जे डे यांनी काही महत्त्वाच्या बातम्या समोर आणल्या होत्या. त्यातून ही हत्या झाली असण्याचा कयास बांधला जात होता. मात्र, या प्रकरणात पत्रकार असलेल्या जिग्ना वोरा  यांना अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. बातमीदारीतली स्पर्धेतून ही हत्या करण्यात आला असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. एका पत्रकाराच्या हत्येत एका महिला पत्रकारालाच अटक करण्यात आल्याने याची मोठी चर्चा झाली होती. 

वेब सीरिजमध्ये आहे तरी काय? 

वेब सीरिजमध्ये जागृती पाठक नावाची क्राईम रिपोर्टर आहे. सात वर्षांच्या नोकरीत, तीन-चार प्रमोशन मिळाल्यानंतर, ती 'ईस्टर्न एज' नावाच्या वृत्तपत्राची डेप्युटी ब्युरो चीफ बनते. दरम्यान, जयदेब सेन नावाच्या वरिष्ठ क्राईम रिपोर्टरची हत्या झाली आहे. जयदेब सेन याने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आणल्या असतात. त्याशिवाय, जयदेब आणखी एका बातमीच्या मागे असतात. त्याच दरम्यान त्यांची हत्या होते. पोलीस या हत्याकांडाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करतात आणि राजन टोळीच्या गुंडासोबत संशयाची सुई जागृतीवर येते. तिचा संबंध उच्च पोलीस अधिकाऱ्यांपासून गुन्हेगारांपर्यंत असतो. जयदेबच्या हत्येच्या आरोपात तिला अटक होते आणि भायखळा महिला तुरुंगात तिची रवानगी होते. जागृतीची रवानगी तुरुंगात झाल्यानंतर त्या ठिकाणी कच्च्या कैद्यांची होणारे हाल, तुरुंग प्रशासनातील भ्रष्टाचार, तुरुंगातील गुंडाराज आदींवर प्रभावीपणे भाष्य करण्यात आले आहे.  

Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्तकावर वेब सीरिज असली तरी यामध्ये माध्यमे आणि त्यांचे सनसनाटी वार्तांकन हे केंद्र स्थानी आहे. माध्यमांची कार्यपद्धत कशी असते, खळबळजनक बातमी असेल तर ती प्रकाशित करण्यााआधी काय विचार होतो, कोणत्या गोष्टींचा दबाव असतो याचे चित्रण दाखवण्यात आले आहे. माध्यमांची कार्यपद्धत जवळून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माध्यमं, पोलीस आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील संबंधांवर मालिका प्रकाश टाकते. एक प्रेक्षक म्हणून आपण काही बिंदू जोडण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी उलगडतात तर काहींची उत्तरे शोधण्यासाठीची जिज्ञासा निर्माण होते. 

दमदार अभिनय...कसदार पटकथा, संवाद

या वेब सीरिजमध्ये सगळ्यांनीच जबरदस्त अभिनय केला आहे. करिश्मा तन्नाने (Karishma Tanna) साकारलेली जागृती पाठक ताकदीची दिसून आली आहे. सूत्रांकडून बातम्या काढण्यासाठी सुरू असलेली धडपड, पोलिसांची कारवाई, तुरुंगातील आयुष्य, वैयक्तिक आयुष्यातील द्वंद, संघर्ष हे करिश्मा तन्नाने चांगलाच साकारला आहे. झीशान अयुबने (Mohammed Zeeshan Ayyub ) या वेब सीरिजमध्ये आपली छाप सोडली आहे. आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन आणि कठीण काळात  त्यांच्या पाठीशी उभा राहणारा आणि मूल्ये पाळणारे संपादक झीशानने उभा केला आहे. आतापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिकांपैकी अत्यंत ताकदीची भूमिकांपैकी एक ही असू शकते. त्याशिवाय, या वेब सीरिजमध्ये प्रत्येकाच्या वाट्याला आलेली लहान भूमिकादेखील सगळ्यांनी जबरदस्तपणे साकारली आहे. कलाकारांच्या मेहनती इतकीच याची पटकथादेखील प्रेक्षकांना खिळवून ठेवते. प्रत्येक क्षणाची उत्सुकता, अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण करण्यात लेखक-दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. प्रसेनजित चॅटर्जी, हरमन बावेजा, तनिष्ठता चॅटर्जी, देवेन भोजानी, इनायत सूद, तन्मय धनानिया, रवी महाशब्दे, असीम हट्टंगडी आदी कलाकारांनी आपली छाप सोडली आहे. 

माध्यम-पोलीस-अंडरवर्ल्ड यांच्यातील संबंधांवर ही मालिका असली तरी मानवी भावना, त्याचा दुटप्पीपणा, दांभिकता यावरही भाष्य करण्यात आले आहे. जागृतीच्या वृत्तपत्रात पुष्कर हा तिचा सहकारी आहे. पण जागृतीला संपादक इम्रानशी जवळीक साधल्याचा फायदा मिळतोय, असं त्याला वाटतं आणि त्यातून तिला प्रमोशन मिळत असल्याचे त्याला वाटते. यातून जागृतीबद्दल त्याच्या मनात असूया असते. तर, दुसरीकडे याच पुष्करच्या पत्नीला तिच्या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळते तेव्हा तिच्याबद्दलही अशाच प्रकारची गॉसिपिंग होत असते. पुष्कर मात्र, तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, एका क्षणाला त्यालाही आपल्या पत्नीच्या प्रमोशनवर संशय येतो. ही पुरुषी मानसिकता-प्रवृत्ती सहजपणे प्रेक्षकांना आरसा दाखवते आणि अंर्तमुख होण्यास भाग पाडते. असे, इतरही काही प्रसंग या वेब सीरिजमध्ये आहेत. 

मागील काही वर्षात माध्यमांमध्ये व्यवस्थापनाचा हस्तक्षेप वाढत चालला असल्याचा आरोप, चर्चा होत असते. 'ईस्टर्न एज'चा संपादक मूल्ये पाळत असतो तर दुसरीकडे त्याच्या प्रखर पत्रकारितेच्या परिणामी वृत्तपत्राला जाहिरातींना मुकावे लागते. पुढं, संपादकीय बैठकीत व्यवस्थापनाकडून कसा हस्तक्षेप केला जातो हेदेखील सूचकपणे मांडण्यात आले आहे. 

व्यवस्थेवर प्रश्न

हंसल मेहता यांनी या मालिकेत काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असल्याचे दिसून येते. काही प्रसंग, पात्र-घटना या काल्पनिक आहेत. तर, काही घटना या वास्तविकपणे घडल्या आहेत. वेब सीरिजच्या माध्यमातून हंसल मेहता फक्त जागृती किंवा जिग्नाची गोष्ट सांगत नाही. ही गोष्ट आपल्याला जिग्नाच्या नजरेतून दिसते. त्यामुळे काही वेळेस ती एकतर्फी वाटते. दुसरी बाजू ठोसपणे समोर येत नाही. तिची गोष्ट ही सध्याच्या परिस्थितीत रुपकाप्रमाणे घ्यावी का, असं वाटतं. हे वाटण्यासाठी वेब सीरिजचा शेवट कारणीभूत आहे. 

वेब सीरिजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये हंसल मेहता भारतातील पत्रकारांची होत असलेली गळचेपी, त्यांच्या हत्या याकडे आपलं लक्ष वेधतात. भारतात मागील काही वर्षात पत्रकारांच्या हत्येत वाढ झाली आहे. गौरी लंकेश ते  आपल्या रत्नागिरीतील शशिकांत वारिसे अशी काही निवडक नावे समोर येतात. विविध राज्यांमध्ये तुरुंगात असलेल्या पत्रकारांची यादी आपल्यासमोर येते. एक नागरीक म्हणून आपली जबाबदारी काय, पत्रकारांच्या गळचेपीवर कोण बोलणार, अशा अनेक प्रश्नांची उकल सोडवण्याची जबाबदारी दिग्दर्शक प्रेक्षकांवर सोपवतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav on Eknath Shinde : शिंदेंचा सवाल, भास्कर जाधव म्हणाले... नक्कल करायला अक्कल लागतेABP Majha Headlines : 11 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Embed widget