एक्स्प्लोर

Singham Again Review : सिंघम अगेन चित्रपट म्हणजे अडीच तासांचा ट्रेलर, डोकं घरी ठेवून पाहायला जा...

Singham Again Movie Review : सिंघम अगेन एक सरासरी चित्रपट आहे, ज्यामध्ये नवीन काहीही नाही. जर तुम्हाला पडद्यावर स्टार्सची भांडणे पाहण्याची आवड असेल तर हा चित्रपट पहा.

Singham Again Review in Marathi : जर तुम्हाला सिंघम अगेनचा ट्रेलर आवडला असेल, तर त्याला 35 पट केल्यावर तुमचा सिंघम अगेन चित्रपट तयार होईल. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हटल्यावर गाड्या तर उडणारच पण, या चित्रपटात जेव्हा तुम्हाला विमानाच्या वरुन गाडी उडताना दिसेल तेव्हा तुम्हाला वाटेल की, भौतिकशास्त्र आणि गुरुत्वाकर्षणच्या आत्म्याला किती दु:ख झालं असेल आणि न्यूटनच्या वंशजांना किती वाईट वाटलं असेल. हा चित्रपट तुम्हाला पसंत पडेल, पण फक्त तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं डोकं घरी ठेवून फक्त तुमच्या आवडत्या स्टारला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाल. अन्यथा, हा चित्रपट म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. 

कहाणी 

सिंघम अगेनच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कहाणी दाखवण्यात आली होती. बाजीराव सिंघमची पत्नी अवनी म्हणजेच करीना कपूरचं अपहरण होते, जसं रामायणामध्ये रावण सीतामातेला पळवून नेतो, इथेही तसंच आहे. चित्रपटात रामायणाचा संदर्भ घेण्यात आला आहे आणि सर्वांनाच माहित आहे की, श्रीरामने पुढे काय केलं, तेच सिंघम करतो. सिंघम अर्जुन कपूरच्या लंकेमधून आपल्या पत्नीला वाचवतो आणि यामध्ये त्याला रोहित शेट्टीच्या चित्रपटातील कॉप युनिव्हर्समधील सर्व स्टारचा पाठिंबा मिळतो. चित्रपटाची कथा ट्रेलरमध्ये आधीच दाखवण्यात आली होती, त्यामुळे त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

चित्रपट कसा आहे?

या चित्रपटाला तुम्ही सिंघम अगेनचा अडीच तासांचा ट्रेलर म्हणू शकता, ओपनिंग सीन खूपच सरासरी दाखवण्यात आला आहे. अजय देवगणची एंट्री त्याच रटाळवाण्या जीर्ण शैलीत आहे, ज्याप्रमाणे बॉलिवूडच्या  आतापर्यंत 14324234234 हिरोंची एन्ट्री झाली आहे. यापेक्षा फुल और कांटेमध्ये त्याची एन्ट्री चांगली झाली होती आणि अर्जुन कपूरचीही चित्रपटात चांगली एन्ट्री दाखवण्यात आली आहे. यानंतर चित्रपट पुढे सरकतो आणि तुम्हाला वाटतं की पुन्हा रोहित शेट्टीचा पूर्वीचा सिंघम देसी होता, म्हणून तो हृदयाला भिडला. या चित्रपटात उगाच मालमसाला जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्टार्स जबरदस्तीने घुसवण्यात आले आहेत. चित्रपटाची कथा रामायणाशी जोडली गेली आहे, जी आवश्यक वाटत नाही. प्रत्येक गोष्टीत श्रीराम नावाचा आधार का घेतला जातो? या बहाण्याने रामायणातील काही गोष्टी कळल्या तर, हा मार्ग योग्य ठरणार नाही. जर कोणाला रामायण समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी इतर मार्ग आहेत, ते रोहित शेट्टीचा चित्रपट का पाहतील? चित्रपटातील ॲक्शन सीन्सही ठीक आहेत, काही दृश्ये दिसायला खूपच मजेदार दिसतात, तर काही डायलॉग्स एकदम खणखणीत वाटतात. एकंदरीत जर तुम्हाला स्टार्सची स्टाइल आणि स्वॅग पहायचा असेल तर तुम्ही चित्रपट पाहू शकता. रणवीर सिंह तुम्हाला हसवतो, त्याची कॉमिक टायमिंग चांगली आहे. अगदी शेवटी सलमान खानचा कॅमिओ देखील करतो परिणामकारक वाटत नाही आणि हा चित्रपट तुम्हाला का आवडणार नाही, हे तुम्हाला बघूनच कळेल आणि यासाठी क्रेडीट रोलच्या वेळी थिएटर सोडू नका. पण, क्रेडीट रोलपर्यंत तुम्ही चित्रपटगृहात राहणार की नाही, ही एक वेगळी बाब आहे. 

अभिनय

अजय देवगणचा अभिनय ठीक आहे. दीपिका पदुकोण ही ट्रेलरमधे आहे, तशीच दिसते, तिची भूमिकाही ट्रेलरपेक्षा थोडीशी जास्त आहे, या चित्रपटात बरेच स्टार आहेत, या कारणामुळे टायगर श्रॉफने कदाचित हा चित्रपट केला असेल, अन्यथा यात त्याच्यासाठी काहीच नाही. रणवीर सिंह नक्कीच तुम्हाला हसवतो आणि तोच हा चित्रपट सहन करण्याची ताकद देतो. अर्जुन कपूर गब्बरसारखा दिसतो, रणवीर सिंहनेही हे स्वतः सांगितलं आहे, पण तो फक्त गब्बरसारखा दिसतो, गब्बरसारखा अभिनय आणि तशी भीती निर्माण करण्याचा त्याचा चांगला प्रयत्न आहे पण तो पुरता फेल गेल्याचं तुम्ही पाहू शकता. अक्षय कुमारची सूर्यवंशीची भूमिका सूर्यवंशी चित्रपटाप्रमाणेच आहे. करीना कपूर सुद्धा विशेष इम्प्रेस करू शकलेली नाही.

दिग्दर्शन

सिंघम अगेनमध्ये रोहित शेट्टीचं दिग्दर्शन सरासरी आहे. त्याच्या आधीच्या चित्रपटात अनेक शिट्ट्या वाजवणारे सीन्स असतात, जिथे लोक कडकडून टाळ्या वाजवतात, पण इथं असं झालेलं नाही. खलनायक अगदी सहज मारल्यासारखा वाटला, मोठा ट्विस्ट नाही. इतके स्टार्स घेण्याऐवजी स्क्रिप्ट आणि पटकथेवर काम करण्याची गरज होती.

एकंदरीत, हा एक सरासरी चित्रपट आहे ज्यामध्ये नवीन काहीही नाही, जर तुम्हाला पडद्यावर स्टार्सची भांडणे पाहण्याची आवड असेल तर हा चित्रपट पहा.

 

View More
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात  22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP Premium

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात  22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Embed widget