एक्स्प्लोर

Ramsetu review: 'वन टाइम वॉच' आहे अक्षयचा 'राम सेतू'; चित्रपटात ग्राफिक्सचा चांगला वापर, वाचा रिव्ह्यू

राम सेतू हा चित्रपट तुमच्यावर पीके किंवा ओ माय गॉड या चित्रपटांसारखी छाप सोडत नाही. या चित्रपटात अक्षयसोबतच , जॅकलीन, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

Ramsetu review:  गेल्या काही दिवसांपासून राम सेतू (Ramsetu) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसोबतच  (Akshay Kumar), जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि कलाकरांच्या अभिनयाबद्दल जाणून घेऊयात...

कथा -  ही राम सेतूची कथा आहे. चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, राम सेतूला पाडण्याचा निर्णय  सरकारनं घेतलेला असतो. कारण राम सेतू हा एका मोठ्या उद्योगपतीच्या मोठ्या प्रकल्पाच्यामध्ये येत असतो. त्या उद्योगपतीची इच्छा असते की, एका नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञानं हे सिद्ध करावं की राम सेतू हा  श्रीराम यांनी  बांधलेला नाही. या पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका अक्षयनं साकारली आहे.  राम सेतू हा  श्रीराम यांनी  बांधलेला नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी अक्षयला देण्यात येते आणि चित्रपटाच्या कथेला सुरुवात होतो. आता अक्षय कुमार हे काम  करण्यासाठी काय करतो? तसेच राम सेतूचे अस्तित्व कसं सिद्ध होते? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 

या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे या चित्रपटाशी श्रीराम यांचे नाव जोडले गेले आहे. या चित्रपटाची निर्मिती अजून चांगल्या प्रकारे होऊ शकली असती. चित्रपट बघताना ही डॉक्युमेंटरी आहे का? असा प्रश्न सतत पडतो. चित्रपटात मनोरंजनाची कमतरता भासते. कथा थोडी चांगली सांगितली असती तर या चित्रपटाशी लोक कनेक्ट करु शकले असते. हा चित्रपट तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकता. या चित्रपटातून राम सेतूबाबत माहिती मिळते. चित्रपटात वापरण्यात आलेले ग्राफिक्स देखील चांगले आहेत.  

कलाकारांचा अभिनय 
अक्षयनं या चित्रपटात चांगलं काम केलं. आहे. या चित्रपटातील अक्षयचा लूक हटके आहे. जॅकलिनचं काम ठिक आहे. नुसरतनं देखील चांगलं काम केलं आहे. पण तिला चित्रपटात कमी स्क्रिन टाईम दिला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता  सत्यदेव महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याचं काम इम्प्रेस करते. 

चित्रपटाच्या दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांच्याकडून प्रेक्षक खूप अपेक्षा करतात. पण हा चित्रपट मात्र अपेक्षेप्रमाणे नाहीये. अभिषेक यांनी तेरे बिन लादेन सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आहेत. पण या चित्रपटाच्या पटकथेवर त्यांनी चांगले काम केलेले नाही. चित्रपट तुम्हाला माहिती देतो पण तर्क आणि विश्वास यांच्यामध्ये कुठेतरी अपेक्षित संतुलन साधत नाही. चित्रपट तुमच्यावर पीके किंवा ओ माय गॉड या चित्रपटांसारखी छाप सोडत नाही.

चित्रपटात श्रीरामाचे एक गीत आहे जे शेवटचे आहे. ते चित्रपटाच्या सुरुवातील वापरायला पाहिजे होते. एकंदरीत हा एक छान चित्रपट आहे. वन टाइम वॉच असणारा हा चित्रपट तुम्ही कुटुंबासोबत बघु शकता. 

Thank God Review: पाप आणि पुण्याचा हिशोब करणारा चित्रपट; कसा आहे अजय देवगणचा 'थँक गॉड'? वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget