Thank God Review: पाप आणि पुण्याचा हिशोब करणारा चित्रपट; कसा आहे अजय देवगणचा 'थँक गॉड'? वाचा
थँक गॉड (Thank God) हा चित्रपट यंदा दिवाळीला कुटुंबासोबत तुम्ही पाहू शकता. कसा आहे अजय देवगणचा 'थँक गॉड'? वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Indra Kumar
सिद्धार्थ मल्होत्रा,रकुल प्रीत सिंह,अजय देवगण
Thank God Review: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाला कुटुंबासोबत जाऊन मनोरंजक चित्रपट पाहायचा असतो. थँक गॉड (Thank God) हा चित्रपट यंदा दिवाळीला कुटुंबासोबत तुम्ही पाहू शकता. या चित्रपटात अजय देवगण (Ajay Devgn), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
चित्रपटाचं कथानक
एका अपघातानंतर स्वर्गात पोहोचलेल्या सिद्धार्थ मल्होत्राची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्याला स्वर्गात YD म्हणजे यमदूत भेटतो. जो त्याची CG म्हणजेच चित्रगुप्ताशी ओळख करून देतो. इथे त्याला मॉडर्न चित्रगुप्ता दिसतो. चित्रगुप्तच्या मॉडर्न स्टाईलबद्दल सिद्धार्थ प्रश्न विचारतो. त्याच्या प्रश्नाला अजय देवगण उत्तर देतो की, 'याला अॅमेझॉन प्राइमच्या जमान्यात दूरदर्शन बघायचे आहे.' अजय देवगणच्या या डायलॉगनं चित्रपटाच्या कथानकाला सुरुवात होते. सिद्धार्थच्या पाप आणि पुण्याचा हिशेब केला जातो आणि चित्रगुप्त त्याच्यासोबत एक गेम खेळतो. या गेममध्ये काय होते ते या चित्रपटाची कथा आहे. राग, मत्सर, लोभ या सर्व गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
कलाकारांचा अभिनय
चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रानं चांगलं काम केलं आहे. त्याने एका सतत चिडचिड करणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका साकारली आहे. जो आपल्या पत्नीचा मत्सर करतो आणि विचित्र परिस्थितीत अडकतो. सिद्धार्थ हा चित्रपटात हँडसम दिसला आहे. पण चित्रपटात सर्वात चांगलं काम अजय देवगणनं केलं आहे. अजय देवगणनं या चित्रपटात चित्रगुप्त ही भूमिका साकारली आहे. अजय आणि सिद्धार्थ यांचे चित्रपटातील सीन्स प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनं सिद्धार्थच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात रकुलच्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाईम देण्यात आलेला नाही पण तिनं चांगलं काम केलं आहे.
हा चित्रपट फक्त 2 तासांचा आहे आणि हेच या चित्रपटाचं वैशिष्ट आहे. चित्रपट बघताना तुम्हाला कंटाळा येणार नाही. चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केलं आहे. त्यांनी धमाल, टोटल धमाल आणि मस्ती यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवत नाही. थँक गॉड या चित्रपटामध्ये इंद्र कुमार यांनी अजून कॉमेडी अॅड केली असती, तर हा चित्रपट बघताना अजून मजा आली असती. पण हा चित्रपट तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकता.
हेही वाचा :