LIVE UPDATE | राज्यात 15 ते 20 ऑक्टोबरपर्यंत निवडणुका लागतील : चंद्रकांत पाटील

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. विविध मागण्यांसाठी राज्यभरात शिक्षकांचं आंदोलन, आज शाळा बंद राहण्याची शक्यता, आझाद मैदानावर शिक्षकांचा एल्गार
2. साताऱ्यात येत्या 3 दिवसात अतिवृष्टीचा इशारा, सांगलीत एनडीआरएफची 2 पथके दाखल, तर खडकवासल्यातून विसर्ग वाढल्याने पुण्यातला भिडे पूल पुन्हा पाण्याखाली
3. देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादवांच्या नेतृत्वात भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक, मतदारसंघ निहाय अहवालावर होणार चर्चा
4. अवधूत तटकरेंचा आज शिवसेनाप्रवेश, 13 सप्टेंबरला भास्कर जाधव स्वगृही परतण्याची शक्यता, तर नवी मुंबईत राष्ट्रवादीचे 55 नगरसेवक वेगळा गट स्थापन करणार
5. विक्रम लॅण्डर चंद्रावर सुस्थितीत, ऑर्बिटरकडून फोटो मिळाल्याची इस्रो प्रमुख के सिवन यांची माहिती, वैज्ञानिकांसह देशवासियांच्या आशा पल्लवित
6. स्पेनच्या राफेल नदालला अमेरिकन ओपनचं विजेतेपद, फायनलमध्ये रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा धुव्वा, नदालचं कारर्कीर्दीतलं 19वं ग्रॅडस्लॅम























