LIVE BLOG : गुजरातच्या बडोद्यात जोरदार पाऊस, सहा तासांत 354 मिमी पावसाची नोंद
LIVE
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. अखेर तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर, मोदी सरकारचं ऐतिहासिक यश, तिहेरी तलाक देणाऱ्याला मुस्लिम पतीला तीन वर्षांची शिक्षा
2. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड, आमदार शिवेंद्रराजे, वैभव पिचड, संदिप नाईकांचा राजीनामा, कोळंबकरांसह चित्रा वाघही आज भाजपात प्रवेश करणार
3. लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करीत इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशभरात बंद. बंददरम्यान
4. पश्चिम महाराष्ट्र, कोकणातलं पाणी मराठवाड्याच्या दिशेनं वळण्यासाठी लवकरच सर्व्हेला कॅबिनेटची मंजुरी, दीड महिन्यात सर्वे पूर्ण करण्याचं टार्गेट
5. धनगरांना आदिवासी समाजाला मिळणाऱ्या काही सवलती लागू, विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय, तर सरपंचाच्या मानधनातही वाढ
7.कॅफे कॉफी डेचे सर्वेसर्वा सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानं खळबळ, घर सोडण्यापूर्वी भावनिक पत्र लिहिल्यानं आत्महत्याचा संशय,