LIVE BLOG : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक
LIVE
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. राजकीय भूकंपासाठी भाजपनं निवडला 31 जुलैचा मुहूर्त, नवी मुंबईतल्या नाईक कुटुंबीयांसह शिवेंद्रराजे, वैभव पिचड, कोळंबकर भाजपात जाणार, सूत्रांची माहिती
2. मुंबईत राज ठाकरे, अजित पवार, राजू शेट्टी आणि जयंत पाटलांची गुफ्तगू, ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणी, 9 ऑगस्टला मनसे रस्त्यावर उतरणार
3.पुण्यातील गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशी रद्द, फाशीच्या अंमलबजावणीला दिरंगाई झाल्यानं निर्णय, सर्व स्तरातून संताप व्यक्त
4. पावसाच्या नॉनस्टॉप बॅटिंगमुळं मुंबईसह राज्यातल्या धरणात खळखळात, गंगापूरमधून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग, गोदावरीसह अनेक नद्यांना पूर,
5. डिस्कव्हरीच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2 ऑगस्टला प्रसारण, पुलवामा हल्ल्यावेळी शुटिंग झाल्याचा विरोधकांचा आरोप
6.भारतीय संघात मतभेद असल्याच्या बातम्यांचा विराट कोहलीकडून इन्कार, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी भारतीय कर्णधाराची पुन्हा रवी शास्त्रींनाच पसंती