LIVE BLOG : राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता, आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं दीर्घ आजाराने निधन, अमित शाह, सोनिया गांधींसह सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन, आज दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार
2. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, श्रीनगरमध्ये अडवणुकीनंतर राहुल गांधी आणि विरोधी पक्षांचे नेते दिल्लीला परतले
3. विधानसभेला शिवसेना-भाजपात एकमेकांच्या सिटींग जागांवर चर्चा नाहीच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं विधान, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
4. एकनाथ खडसे राज्यात राहणार की केंद्रात जाणार, हे केंद्रीय नेतृत्व ठरवणार, भुसावळमध्ये खडसेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा सावध पवित्रा
5. ठाण्यात मनसेकडून पूरग्रस्तांना साडेपाच लाखांची मदत, तर वर्तकनगरमध्ये गोविंदांकडून जवानांना सलामी, मुंबईत 51 गोविंदा जखमी तर रायगडमध्ये एकाचा मृत्यू
6. यूएईच्या सर्वोच्च पुरस्कारानं पंतप्रधान मोदींचा सन्मान, यूएईच्या राजाकडून मोदींचा ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कारानं गौरव























