(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG : विधानसभेला आपण 144-144 जागा लढू, प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला खुली ऑफर
LIVE
Background
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
1. कोहिनूरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीची नोटीस, 22 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, निवडणुकांच्या तोंडावर कारवाई केल्याचा विरोधकांचा आरोप
2. मुंबईत गणेशोत्सवाची लगबग, लाडक्या बाप्पाची वाजतगाजत मिरवणूक, तर गोकुळाष्टमीसाठीही दहीहंडीपथकं सज्ज
3. पाकिस्तानशी आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकला गर्भीत इशारा, तर कलम370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरल्याची टीका
4. दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांना भाजपच्या शाझिया इल्मी भिडल्या, नेटकऱ्य़ांकडून इल्मींवर कौतुकाचा वर्षाव
5. कावळ्यांची नाही तर मावळ्यांची चिंता करा, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवारांचा सल्ला, तर भाजपचं काँग्रेसीकरण सुरु असल्याचा जयंत पाटलांचा टोला
6. योजनेला नावं ठेऊन वृक्षलागवडीसारख्या पवित्र कामाला नावं ठेवू नका, अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रश्नांना सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर