एक्स्प्लोर
LIVE BLOG :पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला आणखी 3000 कोटींचा प्रस्ताव पाठवणार

Background
- मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार, सायन, हिंदमाता भागात पाणी साचलं, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही संततधारा सुरुच, मध्य रेल्वे उशिरानं
- भाजपच्या वाटेवर असलेल्या उदयनराजेंची मनधरणी करण्यात अमोल कोल्हे अपयशी, मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, बैठकीनंतर कोल्हेंचे सूचक उद्गार
- अमेरिका बनावटीची 8 अपाचे एएच-64 लढाऊ हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल, पठाणकोटमध्ये आज लोकार्पण कार्यक्रम
- युद्धाची भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नरमले, पाककडून पहिल्यांदा अण्वस्राचा वापर होणार नसल्याचं विधान
- टीम इंडियानं जमैका कसोटीत विंडीजचा २५७ धावांनी उडवला धुव्वा, भारताचं मालिकेत २-० असं निर्भेळ यश
- दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचं आज विसर्जन, मुंबईतल्या समुद्रात दुपारी भरतीच्या लाटा उसळणार, कृत्रिम तलाव वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन
23:09 PM (IST) • 03 Sep 2019
पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला आणखी 3000 कोटींचा प्रस्ताव पाठवणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय, पहिल्या प्रस्तावात 6,813 कोटींची मागणी प्राथमिक अंदाजाच्या आधारावर करण्यात आली होती, आता पंचनामे आणि केंद्रीय पथकाच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यानंतर अतिरिक्त 3000 हजार कोटींची मागणी
22:16 PM (IST) • 03 Sep 2019
कर्नाटकातील काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांना अटक, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक
Load More
Tags :
Today's News In Marathi Abp Majha Latest Marathi News Trending News Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























