या मोर्चामध्ये एक तरुण लग्नाचं बाशिंग बांधून थेट मोर्चात सहभागी झाले होते.
2/7
या मोर्चानिमित्त दीड हजारावर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांच्या सोबत पाच हजार स्वयंसेवकही नेमण्यात आले होते.
3/7
या मोर्चामध्ये सहभागी दलित समाजातील बांधवांना खाण्या-पिण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती.
4/7
मोर्चाच्या अनुषंगाने धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक गढी, मांजरसुंबा येथून वळवली होती.
5/7
या मोर्चामध्ये दलित, आदिवासी व भटके विमुक्त समाज बांधव पहिल्यांदाच निळ्या झेंड्याखाली एकत्रित झाले होते. विविध जातींचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याने या मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा ‘ड्रेस कोड’ करण्यात आला होता.
6/7
या मोर्चासाठी दलित ऐक्याची महिनाभरापासून मोर्चे बांधणी सुरु होती. वाड्या, वस्त्या, तांड्यांवर व तालुका, शहरस्तरावर बैठका घेण्यात आल्या.
7/7
कोपर्डीप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अॅरट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित ऐक्य मूक मोर्चा काढण्यात आला.