Shivsena | मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत असंतोष, डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेतील डझनभर आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. नाराज आमदारांना शांत करण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यासमोर असणार आहे

मुंबई : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेत नाराजी नाट्य सुरु झालं आहे. शिवसेनेच्या नाराज आमदारांनी आपली नाराजी उघडपणे दाखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील डझनभर आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. नाराज आमदारांना शांत करण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे.
सर्व नाराज आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र या आमदारांनी अजून उद्धव ठाकरेंची अजून वेळ घेतलेली नाही. मंत्रिमंडळात शरद पवारांच्या हस्तक्षेपाने आपल्याला डावल्याची शिवसेनेच्या आमदारांमध्ये कुजबुज आहे. याशिवाय मंत्रिमंडळातील सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला गेल्यानेही शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्यीच चर्चा आहे.मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने ते आणि त्यांचे बंधू शिवसेना खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आपण नाराज नसल्याचं संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर रामदास कदम हे देखील आपल्या शिवसेना नेते पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्च होती. भास्कर जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांनी तर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
कदाचित निष्ठा कमी पडली : प्रताप सरनाईक
कदाचित आपली निष्ठा कमी पडली असेल, तर आगामी काळात ती दाखवून देऊ, अशा शब्दात प्रताप सरनाईक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं की, सत्तेमध्ये मी नाही पण, सत्ताधारी पक्षामध्ये मी आहे. मी उद्धव ठाकरेंना विचारणार आहे की मी कुठे कमी पडलो, माझी काय चूक आहे? आपल्या मनात माझ्याबद्दल राग आहे का? उद्धव ठाकरेंची वेळ मागितली आहे. ते माझी नाराजी दूर करतील असं मला वाटतं. मंत्रिमंडळात असेन असं मला वाटत होतं मात्र शेवटच्या क्षणी काय झालं हे मला माहित नाही, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याने खासदार भावना गवळी नाराज
वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनीही संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून आपली नाराजी व्यक्त केली. संजय राठोड यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भावना गवळींना उमेदवारी मिळू नये यासाठी खूप प्रयत्न केले अशी चर्चा आहे. मात्र उमेदवारी मिळवून त्या विजयीही झाल्या. यावेळी गवळी यांनी बुलडाण्याचे संजय रामूलकर आणि अकोल्याचे संदीप बाजोरीया यांना मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र उद्धव यांनी गवळी यांचे विरोधक असलेल्या संजय राठोड यांनाच कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे भावना गवळी नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेतील कोणते आमदार नाराज आहेत?
सुनिल प्रभू रविंद्र वायकर सुनिल राऊत रामदास कदम दिवाकर रावते प्रताप सरनाईक भास्कर जाधव दिपक केसरकर प्रकाश अबिटकर अनिल बाबर तानाजी सावंत संजय शिरसाट संजय रायमुलकर आशिष जैस्वाल
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
