LIVE BLOG | पाकिस्तानी वस्तूंवर आता थेट 200 टक्के आयातशुल्क, अर्थमंत्र्यांची घोषणा

Background
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, दोन जाहीर सभांनाही संबोधित करणार
2. भारतमातेच्या वीरपुत्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राहुल गांधी आणि लष्करी अधिकाऱ्यांची आदरांजली, हल्ल्याचा बदला घेण्याचा मोदींचा गर्भित इशारा
3. पुलवामा हल्ल्यात बुलडाण्याचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत, दोन्ही जवानांवर आज मूळगावी अंत्यसंस्कार
4. काश्मीरमधील हुर्रियत नेत्यांची सुरक्षा काढली जाणार, गृहमंत्री राजनाथ सिंहांचे संकेत, नवी दिल्लीत आज तातडीची सर्वपक्षीय बैठक
5. पाकचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढण्याचा भारताचा निर्णय, पाकच्या उच्चायुक्तांना विचारला जाब तर पाकमधल्या भारतीय उच्चायुक्तांनाही सरकारचं चर्चेसाठी निमंत्रण
6. अमेरिकेकडून हल्ल्याचा निषेध तर चीनची दुतोंड़ी भूमिका, मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय अतिरेकी घोषित करण्याला चीनची आडकाठी























