आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. नऊ रात्रींच्या या उत्सवाचा जागर करण्यासाठी राज्यातील सर्वच शक्तीपीठांसह घरोघरी होणाऱ्या देवीच्या स्थापना केली गेली.
2/8
महापुजेनंतर वणी देवीची भक्तीभावाने आरती करण्यात आली.
3/8
माहूर नगरी नवरात्रौत्सवासाठी माहुरगडावर जय्यत तयारी झालीय.भाविकांच्या सोयीसाठी गडावर जाण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तसंच दर्शन मार्गावर सगळीकडे स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. जेणेकरून भाविकांना रांगेत असतानाही रेणुका देवीचं दर्शन घेता येईल. गडावर 24 तास रुग्णालय आणि रुग्णवाहिकेची देखील सोय करण्यात आली आहे. दर्शन घेऊन बाहेर पडण्याच्या मार्गावर मंदिर संस्थान तर्फे अन्नछत्र चालवण्यात येणार आहे.
4/8
5/8
नवरात्रीनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरावर 70 हुन अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. तसेच 500 हुन अधिक पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अंबाबाई मंदिराला NDRF चे सुरक्षा कवच दिले आहे.
6/8
7/8
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवला सुरुवात झाली. शासकीय पूजा आणि घटस्थापनेन झाली सुरुवात झाली. महापुजेनंतर तोफेची सलामी देण्यात आली.
8/8
आज सकाळी नाशिकच्या वणी गडावर सप्तश्रृंगी देवीची अलंकार महापुजा करण्यात आली. महापुजेनंतर सप्तश्रृंगीच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावलेल्या आहेत. नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून, पुढचे नऊ दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आली.