एक्स्प्लोर

प्राध्यापक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल! नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्राध्यापक भरती कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे. यामध्ये 75-25 ऐवजी 60-40 चा फॉर्म्युला भरती प्रक्रियेमध्ये असणार आहे.

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्राध्यापक भरती कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे. यामध्ये 75-25 ऐवजी 60-40 चा फॉर्म्युला भरती प्रक्रियेमध्ये असणार आहे. मात्र, प्राध्यापक भरती प्रक्रियेत उमेदवाराला गुणदान देताना विद्यापीठाची एनआयआरएफ आणि परदेशी क्रमवारी बघून गुण देण्याला अभाविपने विरोध केला आहे.  उत्सव व तंत्र शिक्षण विभागामध्ये जवळपास पाच हजार प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे ही भरती करत असताना यावेळी 60-40 फॉर्म्युला ठेवण्यात आला आहे. शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेला 60 टक्के गुण असतील तर अध्यापन कौशल्य चाचणीला 20 टक्के आणि मुलाखत कामगिरीला 20 टक्के गुण असणार आहेत. 

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रँकिंग काय आहेत? हे पाहून गुणदान केले जाणार

नियमांमध्ये शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेच्या 60 टक्के गुणदान करत असताना उमेदवार कोणत्या विद्यापीठात पदवी पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी केली आहे आणि त्या विद्यापीठाची NIRF /QS यांसारखे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रँकिंग काय आहेत? हे पाहून गुणदान केले जाणार आहे. या सगळ्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्र निर्माण होत असून विद्यापीठाची सध्याची क्रमवारी लक्षात घेऊन गुण देणे हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं संघटनेचे म्हणणं आहे. प्रत्येक वर्षी विद्यापीठाची क्रमवारी ही बदलत असते त्यासोबतच विद्यापीठाच्या रँकिंगवरून उमेदवाराची बुद्धिमत्ता आणि कौशल्य तपासणे पूर्णपणे चुकीचा असल्याचा सुद्धा संघटनांचे म्हणणे आहे.  त्यामुळं या सगळ्यावर वाद निर्माण होण्यापेक्षा उच्चतंत्र शिक्षण विभागाने या संबंधी स्पष्टता आणावी अशी मागणी अभाविपने केली आहे.  

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता असावी यासाठी नवीन कार्यपद्धती

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, निष्पक्षता आणि संतुलन असावे यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. 6 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी रद्द करून परिशिष्ट-अ मधील नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आलेत. हा निर्णय कुलपती तथा राज्यपाल यांच्या निर्देशानुसार घेण्यात आलेत. या नव्या कार्यपद्धतीनुसार सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या तिन्ही पदांसाठी एकात्मिक मूल्यमापन प्रणाली लागू असेल. यात उमेदवारांच्या शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेला ६० टक्के, अध्यापन कौशल्य मूल्यमापनाला २० टक्के आणि मुलाखत कामगिरीला २० टक्के देऊन अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget