मिरा-भाईंदरची पहिली महासभा गाजली, टिपू सुलतान चौकाचं नाव बदलण्याचा ठराव मंजूर, नवीन नाव काय असणार?
मिरा-भाईंदर महापालिकेची पहिली महासभा आज गाजली ती टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्यात येण्याच्या मुद्यावरुन.
Mira Bhayander Municipal Corporation : मिरा-भाईंदर महापालिकेची पहिली महासभा आज गाजली ती टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्यात येण्याच्या मुद्यावरुन. भाजपाचे संजय पवार यांनी महासभेत हा ठराव मांडला होता. याला कॉंग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी स्थापन केलेल्या मिरा भाईंदर विकास आघाडीने हरकत घेतली होती. मात्र, लास्ट मुव्हमेंटला मिरा भाईंदर विकास आघाडीने युटर्न घेत, टिपू सुलतान चौकच्या नावाऐवजी स्वातंत्र्य लढयातील महान नेता खान अब्दुल गफार खान यांच नाव सुचवलं तर भाजपाने थोर स्वातंत्र्यसेनानी अशफाक उल्ला खान यांच नाव सुचवलं. 77 विरुध्द 13 मताने अशफाक उल्ला खान यांच नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे.
व्हेज जेवणाच्या मुद्दयावरुन महापालिकेच्या महासभेत चर्चा
आजची महासभा अनेक विषयांनी गाजली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेले अनेक विकास कामावर यावेळी आक्षेप घेण्यात आला. तसेच त्या कामांच्या चौकशीची मागणी देखील करण्यात आली. त्यात कोट्यावधी खर्च करुन बांधण्यात आलेलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादान, चेना नदीवरील पूल, तेथील रस्ते हे विशेष करुन एका बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच महासभेत जेवणाच्या वेळी पालिकेतर्फे ठेवण्यात आलेल्या व्हेज जेवणाच्या मुद्दयावर ही काही नगरसेवकांनी आक्षेप घेत, नॉनव्हेज जेवणाची मागणी केली आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये सत्ताधारी भाजपाने धार्मिक तेढ निर्माण केल्याचा काँग्रेसचा आरोप
मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये सत्ताधारी भाजपाने धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी तसेच वातावरण खराब होऊन वाद चिघळण्यासाठी हजरत टिपू सुलतान चौकाचे नाव बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 18 फेब्रुवारी रोजीच्या महासभेत चालवला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 2016 सालच्या महासभेत हजरत टिपू सुलतान चौकाचे नाव भाजपनेच दिले होते. यावेळी आमदार नरेंद्र मेहता यांनी ठराव मांडला होता. तसेच या ठरावाला भाजपच्या वर्षा भानुशाली यांनी अनुमान दिल्याचा ठरावच काँग्रेसने सादर केला आहे . त्यामुळे भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान, आज महापालिकेची पहिलीची महासभा संपन्न झाली. या सभेत भाजपाने टिपू सुलतान चौकाला थोर स्वातंत्र्यसेनानी अशफाक उल्ला खान यांचं नाव सुचवलं होतं. त्यानंतर यासंदर्भातील ठराव देखील महाभेत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
























