एक्स्प्लोर

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार

इंस्टाग्रामवर अपलोड केलेले फोटो युझर्सचे हावभाव व्यक्त करतात. त्यातून कोण डिप्रेशनमध्ये आहे आणि कोण हेल्दी आहे, हे ओळखता येऊ शकतं, असं एका संशोधनात आढळून आलं आहे.

मुंबई : तुम्ही अनेकदा डिप्रेशनमध्ये असता तेव्हा तुमचं सोशल मीडिया स्टेटस बदलता. सोशल मीडियावर तुमच्या मूडप्रमाणे व्यक्त होता. मात्र आता तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का, हे तुमचे सोशल मीडियावरील फोटोच सांगणार आहेत. तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही, हे इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंवरुन ओळखलं जाऊ शकतं, असा अहवाल नुकताच समोर आला आहे. संशोधनाचा अहवाल काय सांगतो? ईपीजे डेटा सायंस या अहवालानुसार, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो तुमची मानसिक परिस्थिती सांगतात. सर्वसाधारणपणे तुमचे फोटोतील हावभाव, स्टाईल आणि पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट केली जाते. मात्र फोटो यापेक्षाही अधिक काही सांगू शकतात. इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्यापूर्वी त्यामध्ये जे काही बदल केले जातात, जसं की कलर फिल्टर वगैरे, यामधून युझर्सची मानसिक परिस्थिती समजते. डिप्रेशनमध्ये असलेले युझर्स सामान्य युझर्सच्या तुलनेत जगाला वेगळ्या नजरेतून पाहतात, असंही संशोधनात म्हटलं आहे. संशोधक काय म्हणतात? जे लोक डिप्रेशनमध्ये असतात ते त्यांचे फोटो ब्ल्यू, ग्रे आणि डार्क टोन्समध्ये अपलोड करत असल्याचं संशोधनात आढळून आलं, असं हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधक अँड्र्यू रेसी आणि त्यांचे सहकारी ख्रिस्तोफर डॅनफोर्थ यांचं म्हणणं आहे. संशोधन कसं करण्यात आलं? रेसी आणि डॅनफोर्थ यांनी या संशोधनात सहभागी करुन घेतलेल्या युझर्सना 'डिप्रेस्ड' आणि 'हेल्दी' असे टॅग त्यांच्या मेडिकल रिपोर्टच्या आधारावर दिले. त्यानंतर इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या फोटोंमध्ये पॅटर्न्स शोधण्यासाठी लर्निंग टूल्सचा वापर करण्यात आला. संशोधनाचा निकाल काय सांगतो? संशोधनात सहभागी असलेल्या डिप्रेशनमधील युझर्सने फिल्टर्सचा वापर कमी केला होता. या युझर्सने केवळ इंकव्हेल या फिल्टरचा वापर केला. या फिल्टरमध्ये फोटो ब्लॅक अँड व्हाईट होतात. तर हेल्दी युझर्सने व्हेलेंसिया या फिल्टरचा जास्त वापर केला, जे फोटोंचा कलर कमी करतात. डिप्रेशनमध्ये असलेले युझर्स केवळ चेहऱ्याचा फोटो पोस्ट करतात. तर हेल्दी युझर्स वेगवेगळ्या पोझमधील फोटो पोस्ट करणं पसंत करतात. दरम्यान हे संशोधन सर्वच इंस्टाग्राम युझर्ससाठी लागू होत नाही, असंही संशोधनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. नोट : हे वृत्त संशोधनाच्या आधारावर करण्यात आलं आहे. एबीपी माझा या संशोधनाची पुष्टी करत नाही. तुम्हाला संशोधनातील कोणत्याही सल्ल्याला अनुसरुन उपचार घ्यायचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

महत्त्वाच्या बातम्या

Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Embed widget