(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navratri Recipe : नवरात्रीच्या उपवासासाठी दररोज काय पदार्थ बनवावा प्रश्न पडलाय? 'साबुदाण्याची इडली' बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
Navratri Recipe : 'साबुदाण्याची इडली' बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
Navratri Recipe : 'नवरात्रोत्सवा'सोबत (Navratri 2022) नवरात्रीच्या उपवासांनादेखील सुरुवात झाली आहे. काही मंडळी उपवासाचे पदार्थ खात नऊ दिवसांचा उपवास करतात. नवरात्रीच्या उपवासाचे प्रत्येकाचे नियम वेगळे असतात. तुम्हीदेखील उपवास करत असाल तर आज जाणून घ्या 'साबुदाण्याची इडली' (Navratri Recipe) बनवण्याची रेसिपी...
'साबुदाण्याची इडली' बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
साबुदाणा - 200 ग्रॅम
दही - 200 ग्रॅम
वरईचे तांदूळ - 250 ग्रॅम
बेकिंग सोडा
मीठ - चवीनुसार
जिरे - अर्धा चमचा
'साबुदाण्याची इडली' बनवण्याची कृती
- साबुदाणा आणि वरईचे तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- वाटणात दही, मीठ, जिरे आणि गरजेनुसार पाणी टाकून भिजवावे.
- तयार झालेलं मिश्रण एक तास झाकून ठेवावं.
- इडलीपात्राला तेल किंवा तूप लावावे.
- गरजेनुसार एका भांड्यात झाकलेलं मिश्रण काढून त्यात बेकिंग सोडा घालून एकजीव करुन घ्यावे.
- तयार झालेलं मिश्रण इडली पात्रात घेऊन नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या.
- हलकी, चवदार इडली तयार.
'साबुदाण्याच्या इडली' सोबतच्या चटणीची कृती
- खवलेल्या नारळात मिरची, मीठ, चवीपुरती साखर आणि लिंबू पिळून मिक्सरमध्ये दाटसर फिरवा.
- तेलात अर्धा चमचा जिरे टाकून ती फोडणी चटणीवर टाकून इडलीसोबत खा.
उपवास करताना काय काळजी घ्यावी?
- नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे.
- आजारी असल्यास उपवास करणे टाळावे.
- गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा.
- उपवासादरम्यान फळे आणि दुधाचं सेवन करावं.
- आपल्या क्षमतेचा विचार करुन उपवास करण्याचा निर्णय घ्यावा.
- उपवास करताना योग्य आहार घेणं गरजेचं आहे.
संबंधित बातम्या