Navratri Recipe : घरच्या घरी बनवा 'उपवासाची पुरी-भाजी'; जाणून घ्या रेसिपी...
Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर जाणून घ्या 'उपवासाची पुरी-भाजी' बनवण्याची रेसिपी
Farali Puri Bhaji Recipe : गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. दोन वर्षानंतर देशभरात ठिक-ठिकाणी मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव (Navratri 2022) साजरा होणार आहे. 'नवरात्रोत्सव' म्हटलं की डोळ्यासमोर येतं दांडिया, गरबा आणि उपवासाचे पदार्थ. अनेक मंडळी नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करत असतात. पण खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर जाणून घ्या 'उपवासाची पुरी-भाजी' बनवण्याची (Farali Puri Bhaji) रेसिपी...
'उपवासाची पुरी-भाजी' बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
- हिरव्या मिरच्या - 3 ते 4
- बटाटे - 4
- राजगिऱ्याचे पाठी - 2 वाट्या
- साजूक तूप - दोन वाट्या
- जिरे- 1 छोटा चमचा
- मीठ - चवीनुसार
- साखर - चिमूटभर
- आले - 1 चमचा (किसलेले)
- कोथिंबीर - अर्धी वाटी
- कढीपत्ता - 5 ते 6 पाने
- खोवलेला नारळ - अर्धी वाटी
'उपवासाची पुरी-भाजी' बनवण्याची कृती
पाककृती - भाजी
- उपवासाची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे उकडून घ्या.
- उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्या.
- दुसरीकडे गॅसवर साजूक तूप गरम करून घ्यावे.
- तूपात जिरे टाकावेत.
- जिरे तडतडल्यानंतर त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे, कढीपत्त्याची पाने आणि किसलेलं आलं टाकावे.
- नंतर त्यात बटाट्याच्या फोडी, मीठ आणि साखर घालून भाजी वर-खाली करत मिक्स करावी.
- त्यानंतर एक वाफ काढून घ्यावी.
- वाफ दिल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी.
पाककृती - पुऱ्या
- पुऱ्या बनवण्यासाठी एका परातीत राजगिऱ्याचे पीठ घ्यावे.
- त्यात मीठ आणि तूप घालून पीठ भिजवावे.
- दहा मिनिटांनी पीठ चांगले मळून घ्यावे.
- पीठ मळल्यानंतर पुऱ्या लाटून ते तुपात टळून काढा.
संबंधित बातम्या