World Breastfeeding Week 2024 : आईचं दूध बाळासाठी अमृत! मुलाशी नातं होतं घट्ट, अनेक आजारांपासून बचाव, स्तनपानाचे फायदे जाणून घ्या
World Breastfeeding Week 2024 : जागतिक स्तनपान सप्ताहाचा उद्देश महिलांना स्तनपानाचे महत्त्व, तसेच आईच्या दुधामुळे मुलाला कसे फायदे होतात हे आहे.
World Breastfeeding Week 2024 : आईचं दूध म्हणजे बाळासाठी अमृतच म्हणा ना! आईने केलेल्या स्तनपानामुळे तिचं आणि बाळाचं नातं घट्ट व्हायला सुरूवात होते. स्तनपान केल्याने अनेक आजारांपासून बचावही होतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर पुढील 6 महिने केवळ आईचे दूधच बाळाला देण्याची शिफारस डॉक्टर करतात. आणि याचं महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी ऑगस्टचा पहिला आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश महिलांना स्तनपानाचे महत्त्व, तसेच आईच्या दुधामुळे मुलाला कसे फायदे होतात हे सांगणे हा आहे. स्तनपानामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही निरोगी राहते, सोबतच गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.
ऑगस्टचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह
दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो, ज्याचा उद्देश मातांना स्तनपानाच्या महत्त्वाविषयी शिक्षित करणे हा आहे. स्तनपान हे फक्त मुलासाठीच फायदेशीर नाही तर आईला अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे देखील देतात. जागतिक स्तनपान सप्ताह 1992 मध्ये सुरू झाला. आईच्या दुधामुळे मुलाचा योग्य विकास होण्यास मदत होते, यासोबतच स्तनपानासाठी शांत आणि सकारात्मक वातावरण असावे हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. स्तनपान ही नवीन मातांसाठी एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे त्यांना सुरुवातीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, मात्र कधीकधी हे निराशेचे कारण देखील बनते. प्रसूतीनंतर नवीन आई अनेक टप्प्यांतून जाते. प्रसूतीनंतरचे नैराश्य, मुलाशी संबंध नसणे, मुलांच्या संगोपनाची चिंता, या सर्व गोष्टींचा स्तनपानाच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत जोडीदारासह कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक असतो. समर्थन आणि प्रोत्साहन जादूसारखे कार्य करते.
स्तनपानाचे फायदे
आरोग्य आणि तंदुरुस्ती
आईचे दूध हे एंटीबॉडी आणि एंजाइम आवश्यक पोषण प्रदान करते, जे मुलाच्या वाढीस मदत करते. ज्यामुळे त्याचा बुद्ध्यांकही वाढतो.
नातं घट्ट होते
स्तनपानामुळे आई आणि मुलामधील भावनिक संबंध वाढतो.
रोगांचा धोका कमी
स्तनपानामुळे मुलाचे तसेच आईचे अनेक गंभीर संक्रमण, ऍलर्जी आणि जुनाट आजारांपासून संरक्षण होते. स्तनपानामुळे आईच्या गर्भाशयाला प्रसूतीनंतर त्याचा आकार परत मिळण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
स्तनपानानंतर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कारण दूध उत्पादनासाठी स्तनपानासाठी अतिरिक्त ऊर्जा आणि कॅलरीज आवश्यक असतात.
हेही वाचा>>>
आजारी महिलेने स्तनपान करावे का? बाळाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो का?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )