Women Health : महिलांनो.. या 6 मेडिकल टेस्ट केल्या नसतील, तर उशीर करू नका, अनेक गंभीर आजारांचा धोका टळेल.
Women Health : महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, तसेच काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या नियमितपणे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 6 वैद्यकीय चाचण्या, ज्या प्रत्येक स्त्रीने दरवर्षी कराव्यात.
Women Health : अनेकदा महिला स्वत:ची काळजी घेण्यापेक्षा इतरांची काळजी घेण्याला प्राधान्य देतात. तुम्ही पाहिले असेल गृहिणी असो किंवा नोकरदार स्त्री, ती सतत कुटुंबाला काय हवं नको ते पाहत असते. पण याच कामाच्या गडबडीत ती स्वत:ची काळजी घ्यायला विसरते. पण महिलांनो..तुम्ही जर स्वत:चीच काळजी घेतली नाही तर तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकणार नाही, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रिया अनेकदा आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास विसरतात. काम, घर आणि मुलं या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या नियमितपणे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 6 वैद्यकीय चाचण्यांबद्दल सांगत आहोत. ज्या प्रत्येक स्त्रीने दरवर्षी कराव्यात.
महिलांसाठी या चाचण्या महत्त्वाच्या, प्रत्येक स्त्रीने जरूर कराव्या
ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग
स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचा लवकर शोध घेतल्यास त्याच्या यशस्वी उपचाराची शक्यता वाढते. वयाच्या 40 व्या वर्षापासून दरवर्षी मॅमोग्राफी करावी. वयाच्या 30 व्या वर्षापासून, प्रत्येक महिन्याला स्तनांची तपासणी केली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची सूज किंवा बदलाबद्दल डॉक्टरांना सूचित केले पाहिजे.
पॅप स्मीअर चाचणी
ही चाचणी गर्भाशयाचा कर्करोग शोधण्यात मदत करते. ही टेस्ट वयाच्या 21 व्या वर्षापासून सुरू करावी आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत दर 3 वर्षांनी करावी.
थायरॉईड चाचणी
थायरॉईड ही शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करणारी ग्रंथी आहे. थायरॉईडची समस्या महिलांमध्ये सामान्य आहे. थायरॉईड टेस्टमध्ये शरीरातील थायरॉईड संप्रेरक पातळी तपासते.
रक्तातील साखरेची चाचणी
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्यामुळे इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. वयाच्या 45 व्या वर्षापासून दर 3 वर्षांनी रक्तातील साखरेची तपासणी करावी.
रक्तदाब चाचणी
उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार आणि किडनीच्या आजाराचा धोका वाढू शकतो. वयाच्या 18 व्या वर्षापासून दरवर्षी रक्तदाबाची तपासणी करावी.
व्हिटॅमिन बी 12 चाचणी
महिलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता अधिक सामान्य आहे, ज्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मज्जासंस्था आणि हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी 12 चे योग्य प्रमाण आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, व्हिटॅमिन बी 12 ची पातळी तपासणे आवश्यक आहे.
हेही वाचा>>>
Health : भर उन्हातून घरी आल्यावर तुम्हीही फ्रीजमधील थंड पाणी पिता? तर सावधान! आरोग्याला होणारे नुकसान जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )