Women Health: महिलांनो.. मासिक पाळी दरम्यान कॉफी पिता? सुरक्षित की धोका? अनेकांना माहीत नाही कारण, फायदे - तोटे डॉक्टरांकडून जाणून घ्या
Women Health: मासिक पाळी दरम्यान महिला अनेकदा कॉफी पितात कारण ते गरम पेय असते, मात्र हे आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहे? डॉक्टरांकडून जाणून घ्या..

Women Health: ते म्हणतात ना.. जन्म बाईचा.. खूप घाईचा...वाढत्या वयानुसार महिलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यात कमालीचे बदलत होत जातात. मासिक पाळी ही अशा स्टेज असते, जेव्हा महिलांना ओटीपोटात दुखणे, कंबर, मांड्या दुखणे, कमी-जास्त रक्तस्त्राव यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आजकाल अनेक तरुणी मासिक पाळी दरम्यान कॉफीचे सेवन करतात, पण या दरम्यान कॉफी प्यावी की नाही हा एक गंभीर विषय आहे कारण प्रत्येकाची यावर वेगवेगळी मते आहेत. काही लोकांना चहा आणि कॉफी प्यायला आवडते आणि ते सुरक्षित मानतात, तर काही लोक कॉफीला हानिकारक मानतात. हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे
मासिक पाळीत कॉफी पिणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञ काय म्हणतात?
कारण मासिक पाळी हा महिलांसाठी संवेदनशील काळ असतो. यामध्ये आरोग्यदायी आणि चांगल्या सवयींचे पालन करण्यासोबतच खाण्याच्या चुकीच्या सवयीही टाळायला हव्यात. कॉफी पिणे योग्य आहे की नाही हे जाणून घेऊया. आरोग्य तज्ञांकडून जाणून घ्या. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, पी सेफचे प्रमुख डॉ. अजित केआर श्रीवास्तव सांगतात की, कॅफिन हे एक स्ट्रॉंग पेय आहे, ज्याचा शरीरावर जलद परिणाम होतो. मासिक पाळीच्या काळात कॉफी प्यायल्याने काही वेळेस उलट परिणाम होतो. कॉफी प्यायल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते. कॉफी प्यायल्याने कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वर-खाली राहते.
कॉफी पिण्याचे तोटे
डॉक्टरांच्या मते, मासिक पाळी दरम्यान कॉफी पिल्याने तणाव वाढू शकतो. या काळात कॉफीचे सेवन करणे काही लोकांसाठी आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकते, कारण कॉफीचे स्वरूप गरम असते, ज्यामुळे मूड स्विंगसह गॅस, ॲसिडिटीची समस्या उद्भवते. पीरियड्समध्ये झोप आवश्यक असते, जास्त कॉफी प्यायल्याने निद्रानाश होतो. कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.
कॉफी पिण्याचे काही फायदे
- कॉफीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास वेदना कमी होतात.
- कॉफी कमी प्यायल्याने मूडमध्ये बदल होतो.
- कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, त्यामुळे या काळात ती फायदेशीर ठरते.
कॉफी कशी प्यावी?
- मासिक पाळी दरम्यान महिला ब्लॅक कॉफी पिऊ शकतात.
- तुम्ही ही कॉफी मध किंवा दालचिनी घालून पिऊ शकता.
- रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नका.
हेही वाचा>>>
Health: काय सांगता! मांसाहारीपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये Vitamin B-12 ची सर्वाधिक कमतरता? आरोग्य तज्ज्ञ सांगतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

