(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Menstruation Health Tips : मासिक पाळीत चुकूनही 'या' चुका करू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील
Periods Health Tips : प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीच्या चक्रातून जावे लागते, या काळात काय करावे, काय करू नये? हे जाणून घ्या
Periods Health Tips : मासिक पाळी (Monthly Periods) दरम्यान, स्त्रीला रक्तस्त्राव होतो. या काळात स्वच्छतेची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. या पाळीदरम्यान अधिक गंभीर लक्षणे दिसल्यास काय करावे? (Health Tips) हे देखील जाणून घेतले पाहिजे. यावेळी, पीरियड क्रॅम्प्स, शरीरात जडपणा आणि थकवा यासारखी लक्षणे दिसू शकतात. यावेळी योग्य माहिती न मिळाल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो, त्यामुळे प्रत्येक महिलेला मासिक पाळीसंबंधी योग्य माहिती असायला हवी. काही स्त्रिया यावेळी जाणूनबुजून किंवा नकळत काही चुका करतात, ज्यामुळे तिला त्रास सहन करावा लागतो. सामान्यत: मासिक पाळी दरम्यान मुलींच्या शरीरातील मेटाबॉलिझम संथ होते. यामुळे पोटात गॅस निर्माण होऊ शकतो किंवा अपचनालाही सामोरे जावे लागू शकते. मासिक पाळी दरम्यान हा त्रास टाळायचा असेल तर मुलींनी आपल्या आहारातील काही विशेष गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. यावेळी काय करावे आणि काय टाळावे जाणून घ्या
Menstruation Health Tips : मासिक पाळी दरम्यान काय करावे?
-तुम्ही कोमट पाण्यात अंघोळ करू शकता, कारण त्यामुळे खूप आराम मिळतो. कोमट पाण्यानेही दुखणं कमी होतं.
-कोणत्याही शारीरिक हालचाली किंवा हलक्या व्यायामाद्वारे स्वतःला सक्रिय ठेवा. यातून ऊर्जा मिळत राहील, मनःस्थितीही प्रसन्न राहील आणि वेदनाही दूर होतील.
-स्वतःला हायड्रेटेड ठेवा आणि दिवसभर भरपूर पाणी प्या.
-तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. यामुळे भूकही शांत होईल. हे लक्षणे कमी करण्यास देखील खूप मदत करते.
-जास्तीत जास्त प्रथिनांचे सेवन केले पाहिजे.
Menstruation Health Tips : काय करू नये?-
-यावेळी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नये. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
-जंक फूड आणि बाहेरचे अन्न खाणे टाळण्याचाही प्रयत्न केला पाहिजे.
-कॉफीचे वारंवार सेवन करू नये. दररोज एक कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका.
-हीटिंग पॅड वापरल्यामुळे आरामदायक वाटेल,
-अल्कोहोलचे सेवन कमी करा.
-स्वतःला डिमोटिव्हेट करू नका.
-बेक्ड फूड खाणे टाळा. पण त्यात ट्रान्स फॅटही भरपूर असते.
-स्वतःला हायड्रेटेड ठेवा
-फास्ट फूडपासून दूर राहा
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्वाच्या बातम्या
World Prematurity Day : चाळीशीतील गर्भधारणेमुळे वाढतोय मुदतपूर्व जन्माचा धोका, प्रीमॅच्युअर बाळांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )