(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat | टायगर अभी जिंदा है, थोरातांच्या शहरात येऊन सूजय विखेंनी कापला केक
Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat | टायगर अभी जिंदा है, थोरातांच्या शहरात येऊन सूजय विखेंनी कापला केक
संगमनेर विधानसभेत सुजय विखे उमेदवारी करणार ही चर्चा सुरू असतानाच सुजय विखे यांनी गनिमी कावा करत सर्वसामान्य असणाऱ्या अमोल खताळ या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.... लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंके यांच्या पाठीशी पूर्ण ताकद लावली आणि त्याच सुजय विक्यांचा पराभव झाला.. विधानसभा निवडणुकीत मात्र सुजय विखे यांनी अमोल खताळ यांच्या पाठीशी उभे राहत 40 वर्षांची सत्ता उलथवून टाकत बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत परिवर्तन घडवलं.. आणि त्याच नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांना बरोबर घेत शिवसेना पक्षाच्या पहिल्याच बैठकीला स्वतः सुजय विखे देखील मुंबईकडे गेले... मुंबईहून आलेल्या स्पेशल विमानाने ओझर विमान तळावरून हे दोघेही मुंबईकडे रवाना झाले.. पुढील काळात संगमनेर विधानसभा मतदारसंघात अर्जुनाला साथ देणारा श्रीकृष्ण म्हणजे सुजय विखे ही चर्चा आता या निमित्ताने सुरू झालीय हे मात्र नक्की... त्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघात यापुढील काळात घडणार महाभारत निश्चितच महत्त्वाचे राहील यात शंका नाही....