Women Health: बाई...! घट्ट कपडे घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो? काय हा प्रकार? समज-गैरसमज जाणून घ्या...
Women Health: घट्ट कपडे परिधान केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो का? याबाबत काही समज-गैरसमज आहेत. ते जाणून घ्या...
Women Health: आजकाल स्तनांचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरच्या (Breast Cancer Awareness Month) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. विविध वयोगटातील महिला याला बळी पडत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा आजार केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांमध्येही याचे प्रमाण दिसू लागले आहे. ऑक्टोबर हा महिना ब्रेस्ट कॅन्सर जागरुकता महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आपण या संबंधित समज, गैरसमज किंवा सत्य जाणून घेऊया..
घट्ट कपडे परिधान केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो?
ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे आणखी प्रश्न लोकांना पडतोय, तो म्हणजे घट्ट कपडे परिधान केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो का? घट्ट ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो असे कोणतेही संशोधन ठोस पुरावे देत नाही. ब्रा घालणे किंवा न घालणे आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा काही संबंध आहे का? असा दावा करण्यात आला आहे की, रात्री झोपताना अति घट्ट ब्रा मुळे लिम्फ सर्कुलेशनमध्ये समस्या निर्माण होतात, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. मात्र, याला पुष्टी देणारे असे कोणतेही संशोधन आतापर्यंत समोर आलेले नाही. याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.
स्तनाचा कर्करोग हा एक धोकादायक आजार
स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा धोकादायक आणि गंभीर आजार आहे. त्याच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. घट्ट ब्रा घातल्याने स्तनाचा आकार वाढतो असे अनेकांचे मत आहे. याशिवाय स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो, असे बोलले जाते.
घट्ट ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होतो का?
ब्रा घालणे किंवा न घालणे, याचा आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा कोणताही विशिष्ट संबंध नाही. कारण याबाबत संशोधनात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. अंडरवेयर ब्रा लिम्फमधील रक्त परिसंचरणात अडथळा आणू शकते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. ज्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचे कारण बनू शकते. ब्रा घालून झोपायचे की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे.
पट्ट्याची ब्रा किंवा खूप घट्ट ब्रा
पट्ट्याची ब्रा किंवा खूप घट्ट ब्रा घातल्याने स्तनातील लिम्फच्या रक्ताभिसरणात अडथळा येतो. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका खूप वाढतो. मात्र यासाठी कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
काळ्या रंगाची ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होतो का?
हेल्थ एज्युकेशन ऑर्गनायझेशन'च्या अहवालानुसार काळ्या ब्राचा ब्रेस्ट कॅन्सरशी विशेष संबंध नाही. या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत ज्यात तथ्य नाही.
योग्य आहार आणि जीवनशैली
खराब आहार, लठ्ठपणा आणि वाईट जीवनशैली याशिवाय अनुवांशिक कारणांमुळेही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. रेडिएशन आणि जास्त मद्यपान यांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. गरोदरपणातही महिला स्तनाच्या कर्करोगाच्या बळी ठरतात. केवळ वाढत्या वयामुळेच स्तनाचा कर्करोग होत नाही, तर तो लहान वयातही होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी सावध राहण्याची गरज आहे.
हेही वाचा>>>
Men Health: ....म्हणजे आता पुरुषांनाही? 'ब्रेस्ट कॅन्सरचा' धोका वाढतोय, 'या' सवयी त्वरित बदला, अन्यथा पडेल महागात
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )