Winter Health Tips : मुलांना वारंवार सर्दी, खोकला होतोय? वेळीच सावध व्हा; होऊ शकतात न्यूमोनियाची लक्षणं
Winter Health Tips : हिवाळ्याच्या दिवसांत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही न्यूमोनियाचा बळी ठरू शकतो. या दिवसांत अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
Winter Health Tips : कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात (Winter Health Tips) लहान मुलांना अनेक प्रकारच्या संसर्गाची लागण झाल्याचे दिसून येते. या ऋतूमध्ये लहान मुलांना न्यूमोनियाचा (Pneumonia) धोका वाढतो. मुलांमध्ये न्यूमोनियाची बहुतेक प्रकरणे जिवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे होतात. हवामानातील बदल आणि थंडीमुळे न्यूमोनिया हा श्वसनाचा गंभीर आजार असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बदलत्या ऋतूमध्ये मुलांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, ताप, खोकला, जलद श्वास घेणे ही न्यूमोनियाची लक्षणं आहेत. मुलांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचे दूध पाजावे. आईच्या दुधामुळे मुलाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आईच्या दुधात अँटीबॉडीज असतात, जे बाळाला आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. थंडी टाळण्यासाठी मुलाला उबदार कपडे घाला. थंड वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी मुलाचे कान झाकून ठेवा, मोजे घाला. याशिवाय बालकांना न्युमोनियापासून वाचवण्यासाठी पीसीव्ही लस द्यावी. ही लस रोग रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
न्यूमोनिया कोणत्याही वयात होऊ शकतो
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, न्यूमोनिया कोणत्याही वयात होऊ शकतो. अनेक वेळा त्याची लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून येत नाहीत. काही मुलांमध्ये न्यूमोनियामुळे धाप लागणे, उलट्या होणे किंवा खाण्यात अडचण यांसारख्या समस्या उद्भवतात. जलद श्वासोच्छवास किंवा गरगरणे यांसारख्या समस्या पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दिसून येतात. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक व्यवस्थित झाका.
न्यूमोनियाची लक्षणं कोणती? (Symptoms Of Pneumonia) :
ताप, सततचा खोकला, जलद श्वास, उलट्या आणि जुलाब, भूक न लागणे, डिहायड्रेशन, थंडी वाजून ताप येणे, छातीत दुखणे, नखे किंवा ओठ निळे पडणे ही लक्षणे आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :