World Toilet Day 2022 : इंडियन की वेस्टर्न स्टाईल टॉयलेट, तुमच्या आरोग्यासाठी कोणते चांगले? वाचा सविस्तर
World Toilet Day 2022 : आपल्या समाजात दोन प्रकारच्या टॉयलेटचा वापर केला जातो. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने कोणती टॉयलेट स्टाईल सर्वोत्तम आहे, याबद्दल संशोधन काय म्हणते ते जाणून घ्या.
World Toilet Day 2022 : स्वच्छ आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी शौचालय असणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त चांगले जीवन जगण्यासाठीच नाही तर अनेक आजारांपासूनही आपले संरक्षण करण्यासाठी स्वच्छ शौचालय असणे गरजेचे आहे. शौचालय दोन प्रकारची असतात. एक म्हणजे इंडियन आणि दुसरं म्हणजे वेस्टर्न शौचालय. परंतु, अनेकदा लोकांना या दोन्ही शौचालयांपैकी कोणते शौचालय चांगले याबाबत प्रश्न पडतो. आज जागतिक शौचालय दिन (World Toilet Day 2022). या निमित्ताने दोन्ही टॉयलेटचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.
वेळ आणि गरजेनुसार दोन्ही शौचालयांचे वेगळे असे महत्त्व आहे. त्याचबरोबर अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, वेस्टर्न टॉयलेट जरी सुंदर, दर्जेदार आणि आरामदायी दिसत असली तरी त्याचे अनेक तोटे आहेत.
वेस्टर्न टॉयलेटचे तोटे कोणते?
1. संशोधनानुसार, पूर्वीच्या टॉयलेटमध्ये, एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण शरीर म्हणजेच हातापासून ते पायापर्यंत प्रत्येक शरीराचा व्यायाम व्हायचा. मात्र, अलीकडच्या टॉयलेटमध्ये खुर्चीवर बसल्यासारखे वाटते. हे एक प्रकारे आजारी बनविण्याचं लक्षण आहे.
2. इंडियन टॉयलेटमध्ये बसल्यावर फ्रेश व्हायला केवळ 2 ते 3 मिनिटं लागतात. मात्र, वेस्टर्न टॉयलेटमध्ये 5 ते 10 मिनिटं बसूनही फ्रेश वाटत नाही. त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
3. तुम्हाला इंडियन टॉयलेटपेक्षा वेस्टर्न टॉयलेटमध्ये जास्त पाणी लागते. यात अनेक लिटर पाणी वाया जाते. वेस्टर्न टॉयलेटमध्ये पाण्याचा अतिवापर करूनही स्वच्छता राखली जात नाही, त्यामुळे टॉयलेट पेपरचा वापर करावा लागतो, त्यामुळे कागदाचाही अपव्यय होतो.
4. वेस्टर्न टॉयलेट वापरल्याने तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे UTI चा धोका असतो. कारण तुमचा टॉयलेट सीटशी थेट संपर्क येतो. अनेकजण या टॉयलेटचा वापर करत असल्याने कोणाकडूनही आजार पसरण्याचा धोका असतो.
वेस्टर्न टॉयलेटचे फायदे
वेस्टर्न टॉयलेट हे आरोग्यासाठी हानिकारक असले तरी भारतीय शौचालयापेक्षा वेस्टर्न टॉयलेट अधिक आरामदायक मानले जाते. याचा वापर केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारे स्नायूंचा ताण येत नाही. वेस्टर्न टॉयलेट विशेषतः वृद्ध लोकांसाठी सोयीचे आहे. त्याचे फायदे अशा लोकांसाठी देखील आहेत जे ऑस्टियोआर्थरायटिसचे रुग्ण आहेत किंवा ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे, ज्यांना जास्त उठण्याची आणि बसण्याची परवानगी नाही.
इंडियन टॉयलेटचे फायदे
1. जे लोक नियमितपणे व्यायाम करू शकत नाहीत, ते इंडियन टॉयलेट वापरून व्यायाम करत नाहीत. परंतु, हात आणि पायांची हालचाल नक्कीच होते. भारतीय शौचालयात, तुम्ही उठण्यासाठी आणि बसण्यासाठी हात वापरता, ज्यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत होते.
2. जेव्हा तुम्ही इंडियन टॉयलेटमध्ये बसता तेव्हा तुमच्या संपूर्ण पचनसंस्थेवर दबाव पडतो, ज्यामुळे तुमचे पोट व्यवस्थित साफ होते. हेच जर तुम्ही वेस्टर्न टॉयलेटमध्ये जर तुम्ही आरामात बसले तर प्रेशर कमी होते, अशा स्थितीत अनेक वेळा पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
3. इंडियन टॉयलेटचा वापर गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. असे म्हटले जाते की, यामुळे नैसर्गिक प्रसूतीमध्ये खूप मदत होते.
4. इंडियन टॉयलेट वापरल्याने संसर्गाचा धोकाही कमी होतो कारण तुमचा टॉयलेट सीटशी थेट संपर्क येत नाही. तुम्ही
5. इंडियन टॉयलेट वापरल्याने बद्धकोष्ठता सारख्या समस्यांचा धोका कमी होतो डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, भारतीयांच्या तुलनेत पाश्चात्य देशांतील लोकांना पोटाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो.
इंडियन टॉयलेटचे तोटे :
1. वृद्ध लोक, ऑस्टियोआर्थरायटिसचे रुग्ण किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींसाठी इंडियन टॉयलेट त्यांच्यासाठी योग्य नाही, त्यांची समस्या आणखी वाढू शकते.
2. इंडियन टॉयलेट वापरताना जास्त दबाव टाकल्याने मेंदूतील एन्युरिझम पेशींना नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते.
एकंदरीत, दोन्ही शौचालयांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. हे आपल्यावर अवलंबून आहे की, आपले फायदे आणि तोटे लक्षात घेऊन आपण कोणत्या प्रकारचे शौचालय निवडावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्वाच्या बातम्या :
World Toilet Day 2022 : जगातील सर्वात महागडं शौचालय; सोन्याच्या टॉयलेटची किंमत ऐकून हैराण व्हाल