(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Toilet Day 2022 : जगातील सर्वात महागडं शौचालय; सोन्याच्या टॉयलेटची किंमत ऐकून हैराण व्हाल
World Most Expensive Toilet : आज जागतिक शौचालय दिन (World Toilet Day) आहे. या दिवशी जगातील सर्वात महागडं सोन्याने बनलेलं शौचालय कुठे आहे जाणून घ्या.
World Toilet Day 2022 : आज 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन ( World Toilet Day ) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात सिंगापूर येथील जॅक सिम यांनी 19 नोव्हेंबर 2001 पासून केली. 2001 साली जॅक यांनी डब्ल्यूटीओ ( WTO ) म्हणजेच वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनाइजेशनची ( World Toilet Organisation ) स्थापना केली. यानंतर 2013 साली संयुक्त राष्ट्र संघाकडून 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. जनसामान्यांमध्ये शौचालयाचं महत्त्व समजून लोकांना उघड्यावर शौच करण्याला प्रतिबंध करणे हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. लोकांना शौचालयाचं महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो.
'मेकिंग द इनविजिबल विजिबल' ही आहे यावेळीची थीम
जागतिक शौचालय दिन 2022 ( World Toilet Day 2022 ) साजरा करण्यासाठी दरवर्षी एक वेगळी थीम ( World Toilet Day Theme 2022 ) ठेवली जाते. या दिवशी लोकांना शौचालयाचं महत्त्व सांगून जागरूक केले जाते. 2022 ची थीम 'मेकिंग द इनविजिबल विजिबल' ( Making the Invisible Visible ) ही आहे. याचा अर्थ दृष्टीआड असलेली गोष्ट दृष्टीसमो आणणे. मीडिया रिपोर्टनुसार, जगातील 3.6 अब्ज लोकांना योग्य शौचालयांची सोय नाही, तर 673 दशलक्ष लोक उघड्यावर शौच करतात.
जगातील सर्वात महागडं शौचालय
मीडिया रिपोर्टनुसार, भारतात आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शौचालय बांधण्यात आले आहेत. पण तुम्ही कधी जगातील सर्वात महागड्या ( World Most Expensive Toilet ) शौचालयाबद्दल ऐकलं आहे का? जगातील सर्वात महागडं शौचालय चक्क सोन्यापासून तयार करण्यात आलं आहे. हे शौचालय कुठे आहे आणि कोणाकडे आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.
सोन्यानं बनवलेल्या शौचालयासाठी 1 अब्ज रुपयांहून अधिक खर्च
जगातील सर्वात महागडे शौचालय राजघराणे किंवा कोणत्याही श्रीमंत व्यक्तीकडे असेल असं तुम्हाला वाटतं असेल, तर तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जगातील सर्वात महागडं शौचालय पृथ्वीवर नाही, तर अंतराळात आहे. हे शौचालय स्पेस स्टेशनमध्ये आहे. रिपोर्टनुसार, जगातील हे सर्वात महागडं शौचालय सोन्यापासून बनवण्यात आलं आहे. हे शौचालय बनवण्यासाठी सुमारे 19 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1 अब्ज, 36 कोटी, 58 लाख, 72 हजार रुपये खर्च आला आहे. याची देखभाल करण्यासाठीही मोठा खर्च येतो.