एक्स्प्लोर
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय? हार्ट अटॅकपेक्षा भिन्न आहे का?
कार्डिअॅक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कार्डिअॅक अरेस्ट नेमकं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे.
![कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय? हार्ट अटॅकपेक्षा भिन्न आहे का? What is Cardiac arrest and symptoms latest news update कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय? हार्ट अटॅकपेक्षा भिन्न आहे का?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/18115215/Cardiac-Arrest.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. यानंतर पुन्हा एकदा कार्डिअॅक अरेस्टची चर्चा सुरु झाली. कार्डिअॅक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कार्डिअॅक अरेस्ट नेमकं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे.
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डिअॅक अरेस्टचा अर्थ हृदयाची क्रिया अचानक बंद पडणं. हा दीर्घ आजाराचा भाग नाही, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये सर्वात धोकादायक मानला जातो. कार्डिअॅक अरेस्टमध्ये रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते.
हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा भिन्न
कार्डिअॅक अरेस्टला म्हणजेच हृदयविकाराचा झटका असा सर्वसामान्य समज आहे,मात्र हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. जाणकारांचा मते, रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते, तेव्हा कार्डिअॅक अरेस्ट होतो. यामध्ये हृदयातून इतर अवयवांना होणारा रक्तपुरवठा बंद होतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्याने आधी शुद्ध हरपते.
वैद्यकीय भाषेत सांगायचं तर हार्ट अटॅक सर्क्युलेटरी समस्या आहे, तर कार्डिअॅक अरेस्ट हा इलेक्ट्रिक कंडक्शनच्या बिघाडामुळे होतो. कार्डिअॅक अरेस्ट ही मेडिकल इमर्जन्सी आहे. रुग्णाला शॉक देऊन हृदयाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरु केले जाऊ शकते.
छातीत दुखणं म्हणजे काय?
छातीत दुखणं म्हणजे हृदयविकाराचा झटका आहे, असं नाही. डॉक्टरांच्या मते, छातीत दुखणं हे हार्ट बर्न किंवा कार्डिअॅक अरेस्टचंही कारण असू शकतं.
हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्टमधला फरक काय?
कार्डिअॅक अरेस्ट धोकादायक का?
कार्डिअॅक अरेस्टमध्ये हृदयाचा रक्तपुरवठा पूर्णत: बंद होतो. हृदयात वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर होतो. त्यामुळे कार्डिअॅक अरेस्टमध्ये काही मिनिटातंच मृत्यू होऊ शकतो.
कार्डिअॅक अरेस्टची लक्षणं काय?
खरंतर कार्डिअॅक अरेस्ट अचानक होतो. पण ज्यांना हृदयाचा आजार आहे, त्यांच्यात कार्डिअॅक अरेस्टची शक्यता जास्त असते.
कधी कधी कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, छातीत धडधड, चक्कर, शुद्ध हरपणं, थकवा किंवा अंधारी येणं यांसारखी लक्षणं आढळतात.
इलाज कसा होतो?
याच्या इलाजासाठी रुग्णाला कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिलं जातं, जेणेकरुन त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य करता येतील. याच्या रुग्णांना 'डिफायब्रिलेटर'द्वारे वीजेचा झटका देऊन हृदयाचे ठोके सामान्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अर्थ बजेटचा 2025
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)