Weight Loss Drink: हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी 'हे' ज्युस प्या; झटपट कमी होईल वजन, काय आहे तयार करण्याची पद्धत?
Winter Weight Loss Drink : हिवाळ्यात जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तसेच इम्युनिटी वाढवायची असेल तर हा ज्युस तुम्ही प्यायला पाहिजे.
Winter Weight Loss Drink : हिवाळ्यात अनेकांचे वजन वाढते. हिवाळ्यात जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तसेच इम्युनिटी वाढवायची असेल तर हा ज्युस तुम्ही प्यायला पाहिजे. या ज्युसमुळे वेट लॉस होतो, जाणून घेऊयात हा ज्युस तयार करण्याची सोपी पद्धत-
असा तयार करा ज्युस
साहित्य-
हळद पावडर 1 ग्रॅम
काळी मिर्ची
तुळशीची पानं
लिंबाचा रस
लसूण
कृती
लसूण सोलून त्याचे बारीक तुकडे करा. एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाका. त्यानंतर त्यामध्ये हळद पावडर, काळी मिर्ची, लिंबाचा रस आणि तुळशीची पानं टाका. हे सर्व मिश्रण मिक्स करा. हा ज्युस प्यायल्याने शरीरातील फॅट्स बर्न होतात. तसेच या ज्युसमध्ये असणाऱ्या काळ्या मिरीमुळे शरीरातील मेटाबॉजिल्ट चांगल्या पद्धतीने काम करते.
सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हा ज्युस पिऊ शकता. हा ज्युस दिवसातून एकदाच प्या. हा ज्यूस एक ग्लास पेक्षा जास्त प्यायल्याने तुम्हाला जुलाब होऊ शकतात.
पचन क्रिया सुधारते- सकाळी अनोशा पोटी हा ज्युस प्यायल्याने पचन क्रिया सुधारेल तसेच या ज्युसमुळे बॉडी स्ट्रेस देखील कमी होतो.
हळद, आलं आणि अॅपल सायडर व्हिनेगरचं पेय- शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी सकाळी उठून आलं आणि त्यापासून तयार करण्यात आलेली पेय पिणं कधीही उत्तम. हळद आणि आल्यामध्ये असणारे काही गुण दिवसभर तुमच्या शरीरात असणारी रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यास मदतीची ठरतात. हे पेय बनवण्यासाठी ¼ कुटलेलं आलं, ¼ चमचा हळद, 1 चमचा अॅपल सायडर विनेगर आणि चवीनुसार मध या गोष्टींची गरज आहे. हे पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये आलं आणि हळद टाकून 5 ते 10 मिनिटांसाठी हे मिश्रण उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करुन हे मिश्रण गाळून घ्या. हलकंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध आणि अॅपल सायडर विनेगर मिसळून हे पेय प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Health Tips : दररोज दूधात तूप टाकून प्या, पळून जातील आजार; काय आहेत फायदे?
Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )