Umbrella : पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या छत्रीचा शोध नेमका कसा लागला? वाचा छत्रीचा रंजक इतिहास
Types of Umbrella and History : छत्रीचा शोध हा साधारणपणे 4,000 वर्षांपूर्वी लागला.
Types of Umbrella and History : पावसाळ्याला चांगलीच सुरुवात झाली आहे. अशातच पावसाळा सुरु होताच सर्वसामान्यांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत लोकांना हमखास आठवणारी एक गोष्ट असते ती म्हणजे छत्री. एरव्ही कुठेतरी अडगळीच्या खोलीत धूळ खात असलेली छत्री पावसाळ्यात मात्र फार महत्त्वाची वाटते. कुठेही बाहेर जाताना छत्री हातात लागतेच. पण, पावसाळ्यात सर्वात जवळची वाटणाऱ्या छत्रीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी...
छत्रीचा शोध कधी लागला?
छत्रीचा शोध हा साधारणपणे 4,000 वर्षांपूर्वी लागला. सुरुवातीला छत्री इजिप्त, अश्शूर, ग्रीस आणि चीन यांसारख्या देशांत वापरली जाऊ लागली. खरंतर, सुरुवातीला छत्रीचा उपयोग उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केला जात होता. त्यानंतर कालांतराने छत्री पावसाळ्यात वापरू जाऊ लागली. 'Umbrella' म्हणून प्रचलित असलेल्या छत्रीचा मूळ शब्द लॅटिन भाषेत सापडतो. लॅटिन भाषेत छत्रीला 'Umbra' म्हणून ओळखले जायचे. Umbra याचा अर्थ सावली असा आहे. युरोपमध्ये 16व्या शतकापासून छत्र्या या स्त्रीलिंगी वस्तू म्हणून वापरल्या जात होत्या. त्यानंतर पर्शियन प्रवासी आणि लेखक जोनास हॅनवे यांनी इंग्लंडमध्ये 30 वर्ष सार्वजनिकपणे छत्री वापरली तेव्हा ही प्रथा बदलली आणि पुरुष लोकसुद्धा छत्रीचा वापर करू लागले.
सध्या बाजारत आपल्याला अनेक प्रकारच्या छत्र्या पाहायला मिळतात. अतिशय आकर्षक लूक देणाऱ्या या छत्र्यांचे प्रकार नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
1. फोल्डेबल छत्री
हा छत्रीचा एक अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. साधारणपणे 20 व्या शतकात काही छत्र्यांचा शोध लागला. त्यातलीच ही एक फोल्डेबल छत्री. हॅन्स हौप्टने यांनी 1928 मध्ये फोल्ड करण्यायोग्य पॉकेट छत्रीचा शोध लावला. ब्रॅडफोर्ड ई फिलिप्सने 1969 मध्ये पेटंट मिळवले ज्यामध्ये फोल्डिंग छत्रीचे वर्णन केले गेले आहे. अर्थात, तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे आणि फॅशनच्या वाढत्या वेगामुळे, छत्र्यांनी स्वतःला बाजारात वेगवेगळ्या प्रकारात आणलं. या फोल्डेबल छत्र्यांमध्ये तीन पट दुमडलेल्या छत्रीला सर्वात जास्त मागणी आहे. तर, पाच पट दुमडलेली छत्री सर्वात लहान आहे. या छत्र्यांचंं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या तुम्ही बॅगेत, हॅंडबॅंगमध्ये, किंवा अगदी हातात तुम्ही सहज घेऊन फिरू शकता.
2. सॉलिड स्टिक छत्री
या स्टिक छत्र्या विलक्षण डिझाईनपेक्षा लक्झरीवर अधिक लक्ष केंद्रित करतात. यामध्ये छत्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या प्रकारावर जास्त लक्ष दिले जाते. या छत्र्यांची उंची फार मोठी असते तसेच या छत्रीचा दांडा फार मजबूत असतो. त्यामुळे जोरदार पावसात, हवेत ही छत्री उडून जाण्याची भीती नसते. तसेच, इतर छत्र्यांच्या तुलनेत या छत्र्या जास्त टिकाऊ असतात.
3. गोल्फ छत्री
गोल्फ छत्रीचा मूळ इतिहास 14 व्या शतकातला आहे. पूर्वी लोक बॉलने गोल्फ फार खेळायचे. क्लब आणि संघटनांच्या निर्मितीमुळे, स्टाईलिश ऍक्सेसरीजचा वापर आणि लक्झरी खेळ म्हणून लोकप्रिय झाला आहे. गोल्फ छत्र्या इतर छत्र्यांपेक्षा वेगळ्या असतात कारण या छत्र्या मोठ्या पसरतात आणि 60 ते 65 इंच दरम्यान असतात. काही छत्र्या 70 इंच असतात. या छत्र्यांच्या मोठ्या आकारामुळे त्या हाताळण्यास जड जातात. ही समस्या टाळण्यासाठी, त्यात फायबरग्लास ड्रमचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, एक्सल आणि सेपरेटर या सामग्रीचे बनलेले आहेत, ज्यामुळे छत्री हलकी आणि वाहतूक करणे सोयीचे होते. या मोठ्या छत्रीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात अर्गोनॉमिक हँडल आहे.