Travel Tips : नवीन वर्षात फिरायचा प्लॅन करताय? फक्त दोन हजारात 'या' ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्या!
Travel Tips : नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकांचे अनेक ठिकाणी फिरण्याचे प्लॅन बनवायला सुरुवात झाली असेल. पण, अनेकदा हे प्लॅन्स बजेटमुळे रद्द होतात.
Travel Tips : 2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच नवीन वर्षाचं (New Year 2024) स्वागत करण्यासाठी अनेकांचे अनेक ठिकाणी फिरण्याचे प्लॅन बनवायला सुरुवात झाली असेल. पण, अनेकदा हे प्लॅन्स बजेटमुळे रद्द होतात. हिवळ्याच्या दिवसांत तर थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणं म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी तर अशक्यच. अशा वेळी तुम्हाला नवीन वर्ष एखाद्या छानशा पण परवडणाऱ्या ठिकाणी साजरा करायचं असेल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट ट्रिप प्लॅन्स घेऊन आलो आहोत.
या ठिकाणांचे सौंदर्य तुम्हाला वेड लावू शकते. महागाईच्या या युगात, भारतातील ही ठिकाणे बजेट सहलीसाठी तुमचे डेस्टिनेशन बनवा.
रणथंबोर, राजस्थान
हिवाळ्यात राजस्थानातील गरम ठिकाणांना भेट देण्याची मजा काही औरच असते. राजस्थानचे रणथंबोर हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे लोक वर्षभर येत असतात. बहुतेक लोक रणथंबोरला बजेट फ्रेंडली सहलीसाठी येतात. येथे राहणे आणि खाणे पिणे देखील स्वस्त आहे.
बजेट फ्रेंडली ट्रिप करण्याचा हा मार्ग आहे
रणथंबोरची सहल स्वस्तात पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रुप ट्रॅव्हलिंग करावे लागेल. मित्रांबरोबर गेल्याने अनेक गोष्टी स्वस्त होतात. सर्वात आधी, दिल्लीहून स्लीपर तिकीट खरेदी करा ज्याची किंमत सुमारे 300 रुपये असेल. येथे पोहोचल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीने रणथंबोरला पोहोचा. नवीन वर्षात या ठिकाणी राहणं थोडं महाग होते. पण ग्रुपमध्ये असल्याने हॉटेलचा खर्च थोडा स्वस्त पडू शकतो.
हरिद्वार-ऋषिकेश
जरी यावेळी थंड हवेच्या ठिकाणी खूप गर्दी असते. पण, बजेट ट्रिपसाठी तुम्ही मुख्य ऋषिकेशला भेट देऊ शकता. तुम्ही दिल्लीहून ऋषिकेशला जाण्यासाठी तुमची कार घेत असाल तरीही तुम्हाला ट्रिप स्वस्त वाटू शकते. यासाठी मित्रांबरोबर प्रवास करायला विसरू नका. ऋषिकेशला पोहोचल्यानंतर इथे राहण्यासाठी स्वस्त धर्मशाळा मिळेल. याशिवाय जेवणासाठी स्थानिक अन्नच खा. कारण हॉटेल रूम महाग पडू शकतात.
अमृतसर
तुम्ही अमृतसरलाही प्रवासासाठी तुमचे डेस्टिनेशन बनवू शकता. सोलो, कपल किंवा ग्रुप, प्रत्येक प्रकारच्या प्रवासाचा आनंद या शहरात घेता येतो. सुवर्ण मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या अमृतसरमध्ये राहणे आणि अन्न दोन्ही स्वस्त आहे. फक्त राहण्यासाठी चांगली जागा आणि रुचकर जेवण मिळवण्यासाठी शहर थोडे एक्सप्लोर करणे आवश्यक आहे. येथील गुरुद्वारामध्ये यात्रेकरूंची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही अमृतसरमध्ये मोफत किंवा कमी खर्चात राहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :